उत्तरे वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून (Due to not getting answers on time) विरोधी आमदार आक्रमक झाले. Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session 2021: सरकारकडून उत्तरे मिळत नसल्याने विरोधक आक्रमक

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज सकाळपर्यंत लेखी उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे पुरवणी प्रश्न कसे विचारायचे अशी विचारणा केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभेमध्ये (Goa Legislative Assembly) उत्तरे वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून (Due to not getting answers on time) विरोधी आमदार आक्रमक झाले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी उत्तरे दिली जातात असा दावा केला. कोमुनिदाद जमिनी विषयी खटले दाखल केल्या प्रकरणी 24 मार्च उत्तर देण्यासाठी नोंदवलेला व त्यावेळी पुढे ढकलण्यात आलेला प्रश्न आजही पुढील अधिवेशनापर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर या वादास सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज सकाळपर्यंत लेखी उत्तरे मिळाली नाहीत, त्यामुळे पुरवणी प्रश्न कसे विचारायचे अशी विचारणा केली.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, खासगी वनांविषयी सरकार उत्तर देत नाही. याप्रकरणी सरकार काहीतरी दडवू‌ पाहत आहे. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रश्नाचे उत्तर विधिमंडळ सचिवालयाकडे वनखात्याने पाठवले नव्हते. सरकारने गोवा विकायला काढला आहे. जीवन प्रकरणात सर्वे क्रमांक बदलण्याचे प्रकार सरकारने केले आहे. याप्रकरणी अर्ध्या तासाच्या चर्चेची तयारी सरकारने दाखवावी.

मडकईचे सुदिन ढवळीकर यांनी लोहमार्ग दुहेरी करण्यासाठी किती झाडे कापली जाणार या विषयीचे प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर सीडीवर दिले गेलेले नाही. मला सिडी दिल्या या सगळ्या सिडी पहा पण त्यात ते उत्तर नाही. उत्तर मोठे असू शकते पण हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे उत्तर मिळाले पाहिजे.

पर्वरीचे आमदार रोहन‌ खंवटे यांनी नमूद केले कोमुनिनाद जमिनींत मोठा घोटाळा झाला आहे. त्याविषयी कागदपत्रे मी सभागृह पटलावर ठेवत आहे. दोनापावल येथे सरकारी भुखंड खासगी इस्पितळाला देण्यासाठीच्या कराराच्या प्रती का उपलब्ध केल्या जात नाहीत. हा आमदार म्हणून माझा हक्कभंग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT