Yuri Alemao on Goa Police: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यात गुन्हेगारी माफियांना प्रोत्साहन दिल्याने गोव्याचे गुन्हेगारी स्थळ बनले आहे.
वास्कोतील एमईएस कॉलेजजवळ पोलिसांवर गोळीबार म्हणजे गोव्यातील गुन्ह्यांनी नवीन पातळी गाठल्याचे द्योतक आहे, गोवा पोलिस दल हे पाठिचा कणा नसलेले दल आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
झुआरीनगर भागातील एका बंगल्यावर सशस्त्र दरोडा आणि लोटली येथील वृद्ध महिलेकडून सोने हिसकावून घेण्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकारने कृती योजना आखावी अशी मागणी केली आहे.
गोवा राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्याची घटना आणि एका वृद्ध महिलेकडून सोने हिसकावून घेण्याचा दिवसाढवळ्या प्रयत्न म्हणजे गोवा पोलिस विभाग म्हणजे पाठीचा मणके नसलेला दल असल्याचे दाखवून देत आहे.
गुन्हेगारांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची भीती नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
सरकारने पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या अधिकारक्षेत्राबाबत जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. गोव्यातील गुन्हेगारांच्या बदलत्या कारवाया पाहता पोलीस विभागाला प्रगत उपकरणे आणि वाहने देण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारला इव्हेंट्स आणि मिशन टोटल कमिशनचे वेड लागले आहे. लोकांच्या समस्यांकडे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. गोव्यातील जनतेने या अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.