Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session : राज्‍यात 2025 पर्यंत विजेची मागणी 4810 दशलक्ष युनिट्स : वीजमंत्री सुदिन ढवळीकर

इलेक्ट्रिक वाहनांमुळे येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढतच जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session : २०२५ पर्यंत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी आणि ग्राहकांची वार्षिक विजेची एकूण मागणी ४८१० दशलक्ष युनिट्स असणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोव्यात एकूण वीजवापर ४३१६.२० दशलक्ष युनिट्स होता, अशी माहिती वीजमंत्री ढवळीकर यांनी दिली. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याबाबत प्रश्‍‍न विचारला होता.

विजेची मागणी आणि विजेचा वापर दिवसेंदविस वाढत आहे. सरकारने स्थानिकांना हरितऊर्जेला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची निवड करण्यास प्रोत्साहन दिल्याने, येत्या काही वर्षांत विजेची मागणी वाढतच जाणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

राज्‍यातील इलेक्ट्रिक ट्रेनद्वारे विजेच्या वापराशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना ढवळीकर म्हणाले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक ट्रेनद्वारे विजेचा अंदाजे वार्षिक वापर ४० दशलक्ष युनिट्स इतका असेल.

आर्थिक वर्षात विजेचा वापर दशलक्ष युनिट्‌समध्ये

  • २०१९-२० ३७२२.९७

  • २०२०-२१ ३७६७.१६

  • २०२१-२२ ४०१९.४०

  • २०२२-२३ ४२०६.००

२०२४-२५ या आर्थिक वर्षात घरगुती वापरासाठी अंदाजे १५०० दशलक्ष युनिट्स विजेचा वापर होणार आहे. तसेच व्यावसायिक वापरासाठी ७०० दशलक्ष युनिट्स, औद्योगिक २५०० दशलक्ष युनिट्‌स, कृषी ४० दशलक्ष युनिट्‌स तर इतर श्रेणींसाठी ७० दशलक्ष युनिट्सची गरज भासणार आहे.

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT