नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात भरपाईची घोषणा केली आहे. 
गोवा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाप्पा पावला! मदतीबाबत CM सावंतांची सभागृहात घोषणा; या तारखेपूर्वी भरपाई मिळणार

Goa Legislative Assembly Monsoon session 2024: गेल्या आठवडाभरापासून पावसाने गोव्याला झोडपले असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session 2024

पणजी : गेल्या आठवडाभरापासून पावसाने गोव्याला झोडपले असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा शुक्रवारी विधानसभेतही उपस्थित झाला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात महत्त्वाची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होईल असे आश्वासन सावंत यांनी दिले. यंदा गणेश चतुर्थी सात सप्टेंबररोजी आहे.

गोव्यात जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नव्हता. मात्र, जुलै महिना उजाडताच पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली. वाळपई, सांगे, साखळी या भागात सर्वाधिक पाऊस बरसला आहे. पावसामुळे राज्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधक करत होते. शुक्रवारी विधानसभेत विरोधकांनी नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला.

विरोधी पक्षांच्या आमदारांनी राज्यावर मानवनिर्मित आपत्ती ओढावल्याची टीका करत सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार ठरवले. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली. अखेर या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना मदत जाहीर केली. न

राज्यातील पावसाचे संकट आणि नुकसान भरपाई याबाबत सावंत यांनी सभागृहात केलेल्या प्रमुख घोषणा

  • अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई जमा केली जाईल. कृषी अधिकारी सर्व भागात जाऊन नुकसानीचा पंचनामा करतील.

  • नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांच्या घर किंवा सदनिकेची हानी झाली असेल त्यांना आपत्ती व्यवस्थापनाकडून २ लाख रूपये मदत सरकार करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

SCROLL FOR NEXT