Minister Mavin Gudinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात रस्ते अपघातात साडेचार वर्षांत 586 दुचाकीस्वारांचा मृत्यू ;मंत्री गुदिन्हो यांची माहिती

दरवर्षी सरासरी दीडशे बळी; हेल्मेट न वापरल्याचा परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या साडेचार वर्षांत रस्ता अपघातात ५८६ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.

सरासरी दिडशेच्या आसपास दरवर्षी दुचाकीस्वारांचा बळी जात आहे. हेल्मेट वापरल्याने अनेकांचा जीव बचावला आहे तर हेल्मेट न वापरल्याने भीषण अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राज्यात २०१९ पासून ते आतापर्यंत किती अपघात झाले आहेत. ज्यामध्ये दुचाकीचा समावेश आहे, असा प्रश्‍न आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी विधानसभेत विचारला होता त्यावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी उत्तर देताना ५८६ जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

२०१९-२० या वर्षात १५७ जण, २०२०-२१ या वर्षात १२०, २०२१-२२ या साली १३०, २०२२-२३ या वर्षात १५१ तर मार्च २३ ते आतापर्यंत २८ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, अशी माहिती दिली आहे.

राज्यातील अपघातांची आकडेवारी...

दक्षिण गोव्यात २०१९-२० या आर्थिक वर्षात १,१२५ दुचाकीचे अपघात झाले, त्यापैकी ३२१ जणांनी वापरले नव्हते. या अपघातात ८३ दुचाकीचालक तर १४ सहचालक ठार झाले.

उत्तर गोव्यात ८३१ दुचाकींचे अपघात झाले, त्यामध्ये ७२ जणांनी घातले नव्हते. त्यामध्ये ७४ दुचाकीचालक तर १३ सहचालकांचा बळी गेला आहे.

२०२०-२१ मध्ये दक्षिण गोव्यात ८९९ दुचाकी अपघात झाले, त्यामध्ये ७९० जणांनी हेल्मेट वापरले होते तर १७९ जणांनी नव्हते. त्यामुळे या झालेल्या अपघातात ७६ चालक व १४ सहचालकांचा मृत्यू झाला होता.

उत्तर गोव्यात ५६२ दुचाकी अपघातातील ५३७ जणांनी हेल्मेट घातले होते तर २५ जणांनी नव्हते. त्यामध्ये ४४ चालकांचा तर ७ सहचालकांचा मृत्यू झाला होता.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात दक्षिण गोव्यात ९५६ दुचाकी अपघात झाले होते, त्यामध्ये १९३ जणांनी हेल्मेट घातले नव्हते.

या अपघातात ७८ चालक व १९ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर गोव्यात ७०३ दुचाकीचे अपघात झाले त्यावेळी ४१ जणांनी वापरले नव्हते. त्यावेळी ५२ चालकांचा तर ९ सहचालकांचा बळी गेला.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात दक्षिण गोव्यात १,१९४ दुचाकी अपघात झाले, त्यामध्ये १,०४४ चालकांनी हेल्मेट घातले होते तर १८५ जणांनी वापरले नव्हते.

त्यामुळे ९२ चालकांचा तर २२ सहचालकांचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यात ९०४ दुचाकींचे अपघात झाले त्यातील ८५८ चालकांनी हेल्मेट वापरले होते तर ६१ जणांनी वापरले नव्हते. ८७ चालक व १० सहचालकांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT