michael lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: म्हादईवरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं, गोव्याकडं मोदी सरकार दुर्लक्ष करतंय का? लोबो कडाडले

MLA Michael Lobo: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दक्षिण गोव्‍यातील प्रस्‍तावित सनबर्नवरुन सरकारला घरचा आहेर दिला होता.

Manish Jadhav

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दक्षिण गोव्‍यातील प्रस्‍तावित सनबर्नवरुन सरकारला घरचा आहेर दिला होता. आता म्‍हादईच्‍या प्रश्‍‍नावरुन त्‍यांनी खडे बोल सुनावले आहेत. कळसा-भांडुराचे पाणी मलप्रभेत वळवण्‍यासाठी कर्नाटक सरकार भरीव निधीची तरतूद करते. गोव्‍याला मात्र कर्नाटकच्‍या खेळींना रोखता आलेले नाही, अशा आशयाचे विधान त्‍यांनी अधिवेशनात केले.

दरम्यान, लोबो जलसंपदा व सहकार खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर बोलत‌ होते. ते म्‍हणाले की, गोवा-कर्नाटकमधील म्हादई वादाला आता दशके उलटली आहेत. त्या प्रश्नाला आता राजकीय रंग दिला जात आहे. निवडणुकानजीक आल्यावर तेवढा मुद्दा चर्चेत येतो. म्हादईच्या प्रश्नाकडे जलसंपदा खात्याने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तिकडे कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवले आहे आणि आम्ही येथे बोलतच राहिलो आहोत, अशी खंतही त्‍यांनी बोलून दाखवली.

लोबो म्हणाले की, ''एक दशकापासून म्हादईवर दोन्ही राज्ये फक्त राजकारण करत आले. कर्नाटकाने आधीच पाणी वळवले. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यात याची पाहाणी व्हायला हवी होती.'' गोव्याचे फक्त 2 खासदार केंद्रात असल्यामुळे मोदी सरकार गोव्याला गांभीर्यानं घेत नाही का? असा सवाल आमदार मायकल लोबो यांनी सभागृहात केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "500 रुपये मानधन मान्य नाही!" बाल रथ चालकांचा निवडणूक ड्युटीच्या मोबदल्याला नकार

Goa ZP Election: मतदानाला सुट्टी मिळाली नाही! नागरिक संतप्त; कारवाई करण्याची होतेय मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ‘माझे घर’चे गाजर

Shubhman Gill Dropped: '..या कारणासाठी शुभमनला वगळले'! अजित आगरकरने सांगितले धक्कादायक कारण; उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे

Goa Crime: पोलिस बोलावताहेत म्हणून गेली, तोतयांनी पळवले 6 लाखांचे मंगळसूत्र; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे डिचोलीत गोंधळ

SCROLL FOR NEXT