Mopa Airport Project Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीत आश्वासनं देणाऱ्या उमेदवारांची मोपा आंदोलनाकडे पाठ

भविष्यात पेडणेकरांना हे उमेदवार रोजगार काय देणार, पीडित शेतकऱ्यांचा सवाल

दैनिक गोमन्तक

पेडणे : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, मगो, आणि इतर पक्षाच्या उमेदवारांनी मोपा विमानतळावर निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि लहानमोठ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं होतं. पुढील पाच वर्षात पेडणे मतदार संघात एकही बेरोजगार युवक मिळणार नाही. मोपात निर्माण होणारे रोजगार आणि व्यवसाय आम्ही पेडणेकरांनाच मिळवून देणार, त्यासाठी आम्ही सदैव पेडणेवासियांसोबत असणार अशी ग्वाही या उमेदवारांनी दिली होती. परंतु ज्या प्रकल्पाच्या विरोधात पीडित शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनात मात्र हे उमेदवार फिरकलेही नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. आम आदमी आणि काँग्रेस उमेदवारांनी मात्र आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. (Mopa Airport Project News Updates)

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे (BJP) प्रवीण आर्लेकर, मगोचे राजन कोरगावकर, काँग्रेसचे जितेंद्र गावकर, आरजीचे सुजय म्हापसेकर, अपक्ष विष्णुदास कोरगावकर, आम आदमी पार्टीचे पुंडलिक धारगळकर, शिवसेनेचे सुभाष केरकर हे उमेदवार रिंगणात होते. प्रत्येकांनी मोपाप्रश्नी आपण पेडणेकरांसोबत असल्याचे जाहीर केले होते. तालुक्यातील प्रकल्पातून निर्माण होणारे रोजगार स्थानिक पेडणेकराना मिळवून देणार, असे सांगून आम्ही सदैव पेडणेकरासोबत असणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती.

मागचे वर्षभर आणि विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) झाल्यानंतरही मोपा लिंक रोडसाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र ज्या उमेदवारांनी मतं मागताना मोपाप्रश्नी साथ देण्याचा वायदा केला तेच उमेदवार फिरकलेच नसल्याने आंदोलनकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. केवळ मतासाठी आमच्या दारावर वारंवार येत होते, त्याना पेडणेकरांचे काहीच पडलेले नाही, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

निवडणुकीच्या काळात आपणच पेडणेकर म्हणून एकमेकावर टीका करून हे उमेदवार मते मागत होते. ज्या मोपा (Mopa) प्रकल्पाला केंद्रबिंदू मानून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले, त्या प्रकल्पातून पेडणेकरांवर संकट आले असतानाच हेच उमेदवार आज रस्त्यावर येत नाहीत ते भविष्यात पेडणेकरांना रोजगार काय देणार, असा सवाल पिडीत शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये मोठी दुर्घटना; पाकिस्तानी खेळाडूमुळे पंच जखमी, चेंडू थेट डोक्यात...VIDEO VIRAL

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

SCROLL FOR NEXT