roshan redkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

roshan redkar calangute candidacy: आगामी विधानसभा निवडणूक कळंगुट मतदारसंघातून लढविण्याचा निर्धार नागवा-हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कळंगुट: आगामी विधानसभा निवडणूक कळंगुट मतदारसंघातून लढविण्याचा निर्धार नागवा-हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी व्यक्त केला आहे. रविवारी संध्याकाळी हडफडे येथे समर्थकांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली. कळंगुटमधून निवडणूक लढविणे हा आपला घटनात्मक अधिकार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

या पत्रकार परिषदेला सुमारे तीनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘रोशन रेडकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. घोषणांमुळे परिसर दणाणून गेला. ‘बर्च बाय रोमियो लेन’ आगदुर्घटनेनंतर आपण नवी सुरुवात करत असल्याचे रेडकर म्हणाले. कळंगुट मतदारसंघात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या विद्यमान आमदारांना घरी बसविण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी आमदार मायकल लोबो यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

विद्यमान आमदारांनी विकासाच्या नावाखाली विरोधकांशी वैयक्तिक वैर काढण्याचे राजकारण केल्याचा आरोपही रेडकर यांनी केला. यापुढे आपल्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रयत्न झाल्यास संपूर्ण गावाला सोबत घेऊन संबंधितांच्या दरवाजात जाणार, असा इशारा त्यांनी दिला.

आग दुर्घटनेच्‍या मुद्यावर चर्चेसाठी कधीही तयार

‘बर्च’ दुर्घटना मुद्यावर आमदार मायकल लोबो यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यास आपण आजही उत्सुक असल्याचे रोशन रेडकर यांनी सांगितले. या प्रकरणावर लोबो यांच्याशी समोरासमोर चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. तसेच, कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रयत्न झाल्यास संपूर्ण गावाला सोबत घेऊन संबंधितांच्या दरवाजात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अनेक पक्षांनी संपर्क साधल्‍याचा दावा

आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीसंदर्भात आपल्याशी संपर्क साधल्याचा दावा रेडकर यांनी केला. काँग्रेसने (Congress) कळंगुटची उमेदवारी दिल्यास आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

SCROLL FOR NEXT