Yuri Alemao Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Political Alliance: विरोधकांचे आघाडीचे पाऊल; जागावाटप पुन्‍हा लांबणीवर! फॉरवर्ड, आरजीसोबतच्‍या बैठकीला गिरीश, युरींची दांडी

Goa Political Alliance 2027: ‘‘गोवा फॉरवर्ड आणि आरजीसोबत रविवारी बोलावलेली बैठक जागावाटपाबाबतच होती. त्‍यात तिन्‍ही पक्षांत प्राथमिक चर्चा झालेली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: विधानसभा निवडणुकीतील आघाडी आणि जागावाटपाबाबत काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी रविवारी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजी) राष्‍ट्रीय अध्‍यक्ष वीरेश बोरकर यांच्‍याशी चर्चा केली. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव बैठकीला उपस्‍थित नव्‍हते. त्‍यामुळे या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या दोघांच्‍या उपस्‍थितीत पुढील बैठक होऊन त्‍यात जागावाटपावर शिक्‍कामोर्तब होईल, असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘‘गोवा फॉरवर्ड आणि आरजीसोबत रविवारी बोलावलेली बैठक जागावाटपाबाबतच होती. त्‍यात तिन्‍ही पक्षांत प्राथमिक चर्चा झालेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर आजारी असल्‍याने तसेच युरी आलेमावही वैयक्तिक कामात व्‍यस्‍त असल्‍याने ते बैठकीला उपस्‍थित राहू शकले नाहीत. या दोघांच्‍या उपस्‍थितीत लवकरच तिन्‍ही पक्षांच्‍या नेत्‍यांत बैठक होईल आणि त्‍यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्‍यात येईल’’, असे माणिकराव ठाकरे म्‍हणाले.

अमित पाटकर जिंकतील!

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांच्‍यासंदर्भात पत्रकारांनी माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, ‘‘अमित पाटकर हे प्रदेश काँग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांपैकी एक आहेत. ते आपल्‍या मतदारसंघात पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. ते तेथून निवडणूक लढवून विजयी होतील’’, असा विश्‍‍वास त्‍यांनी व्‍यक्त केला.

‘‘सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव करण्‍यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या तीन पक्षांची आघाडी होत आहे. जागावाटपासंदर्भात रविवारी सकारात्‍मक चर्चा झाली. पुढील बैठकीत त्‍यावर शिक्‍कामोर्तब होईल.’’

- विजय सरदेसाई

‘‘जागावाटपासंदर्भात आरजीने काँग्रेसला अगोदरच प्रस्‍ताव दिलेला आहे. त्‍याबाबत रविवारच्‍या बैठकीत चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय पुढील बैठकीत होईल.’’

- वीरेश बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: राजकारण्यांचे भक्त...

Indian History: भारताचा इतिहास वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज; ‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांचे उद्गार

Amit Shah Speech: 'देशाची बदनामी करुन सत्तेत येता येणार नाही', अमित शहा यांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींच्या विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक

Goa Politics: कन्नडिगांची नजर गोवा विधानसभेवर! राजकीय सक्षमीकरणासाठी संघटित होण्याचे संदीप पाटीलांचे प्रतिपादन

Dayanand Mandrekar Resigns: स्‍वकियांच्या छळामुळेच महामंडळाचा राजीनामा दिला, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT