Goa Politics: कन्नडिगांची नजर गोवा विधानसभेवर! राजकीय सक्षमीकरणासाठी संघटित होण्याचे संदीप पाटीलांचे प्रतिपादन

Kannada community Goa: कन्नड समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोवा विधानसभेत समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्‍न केले पाहिजेत, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप पाटील यांनी केले.
kannada community political empowerment sandeep patil
kannada community political empowerment sandeep patilDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: गोव्यातील कन्नडिगांनी म्हादई नदीच्‍या प्रश्‍‍नावर गोव्याला ठाम पाठिंबा दिला पाहिजे. तसेच कन्नड समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोवा विधानसभेत समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्‍न केले पाहिजेत, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप पाटील यांनी केले. अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे झुआरीनगर-वास्‍को येथे रविवार, ता १५ नोव्‍हेंबर रोजी आयोजित ‘कर्नाटक राज्योत्सव’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.

यावेळी व्‍यासपीठावर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, सांकवाळचे जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस, कुठ्ठाळी भाजप मंडळाचे प्रभारी दीपक नाईक, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिदाण्णा मेटी, अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष रुद्रय्या हिरेमठ, सचिव शिवानंद भिंगे आणि भाजप कर्नाटक विभागाचे निमंत्रक मुरली शेट्टी उपस्थित होते. मुरली शेट्टी यांनीही कन्नड समाजाचे गोव्याशी अनेक वर्षांचे नाते असून, राज्याच्या सामाजिक जडणघडणीत समाजाचे योगदान असल्याचे सांगितले.

kannada community political empowerment sandeep patil
Political Betrayal in Goa: 500 वर्षांनंतरही विश्वासघाताची सावली; गोव्याच्या राजकारणाला आत्मपरीक्षणाची गरज

गोवा हीच माझी कर्मभूमी : मुरली शेट्टी

गोव्यात (Goa) गेल्या ३६ वर्षांपासून वास्तव्यास असलेले मुरली शेट्टी यांनी म्हादई प्रश्नावर गोव्याला पाठिंबा दर्शविला. गोव्याने मला सर्व काही दिले आहे. त्यामुळे म्हादईच्या प्रश्नावर मी गोव्याच्या बाजूने आहे. या प्रकरणी न्यायालय योग्य निर्णय देईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.