Goa BJP President Sadanand Shet Tanavade (Goa Assembly Election 2022) Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2022: डिसोझा यांनी मला निवडणूक लढविण्याचा सल्ला देऊ नये...

गोवा भाजपतर्फे सर्व मतदारसंघात शक्ती मोर्चा पदाधिकार्‍यांच्या बैठका (Goa Assembly Election 2022)

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Election 2022: गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Goa NCP President) जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza) यांनी मला येणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा सल्ला देऊ नये. खरंतर डिसोझा यांनी दाबोळीतून निवडणूक लढविताना आपली अनामत रक्कम जप्त होण्यापासून रोखण्याचा विचार करावा. दाबोळीत त्याचा पराभव निश्चित असून, मी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. भारत देशाच्या तिरंग्याचा अपमान करण्यानी मला सल्ला देऊ नये, असे प्रतिपादन गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (Goa BJP President) सदानंद शेटतानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी केले.

गोवा भाजपतर्फे (Goa BJP) सर्व मतदारसंघात गट समित्यांबरोबर शक्ती मोर्चा (BJP Shakti Morcha) पदाधिकार्‍यांच्या बैठकीवेळी वरील माहिती राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांनी दिली. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा मुरगाव तालुक्यातील हा दुसरा दोरा होता. यापूर्वी त्याचा दाबोळी येथील गट समिती व इतर पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर बैठक संपन्न झाली होती. गुरुवार (दि.२६) प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा मुरगांव मतदार संघात ९ वाजता दौरा होता. यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेविका मंजुषा पिळणकर, मृणाली मांद्रेकर, नगरसेवक दयानंद नाईक, दामू नाईक, शंकर रामचंद्र कामत, मोरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, महिला मोर्चा अध्यक्षा छाया होन्नावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर, अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक विभागाचे समिती माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, माजी नगरसेवक मुरारी बांदेकर, शेखर मांद्रेकर, महादेव डिचोलकर, जयप्रकाश पेडणेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष तानावडे मुरगाव सडा भागात प्रवेश करताच त्याचे मुरगांव भाजप मंडळातर्फे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. नंतर त्यानी सडा भागातील ग्रामदेव श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवाचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित असलेले तानावडे व मंत्री नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मी कुठून निवडणूक लढवावी यासाठी माझा मी समर्थ...

या प्रसंगी उपस्थित पत्रकारांना माहिती देताना प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की उत्तर व दक्षिण मिळून मुरगावात आज ९ वाजता दौरा असून यात भाजप मंडळाला विविध समित्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती विषयी माहिती देणे, तसेच मंडळाकडून त्याचे विचार समजून घेणे, २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्णपणे बहुमत प्राप्त करणार आहे. कारण गोव्यात भाजपला वाढता प्रतिसाद लाभत असल्याने भाजप यात यशस्वी होणार असल्याची माहिती तानावडे यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी मला विधानसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ नये. मी राज्याचा प्रदेशाध्यक्ष असल्याने मी माझा समर्थ आहे, की मी कुठून निवडणूक लढवावी. देशाच्या तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांनी मला सल्ला देणे शोभत नाही. दाबोळीत डिसोझा यांचा पराभव निश्चित आहे. त्यानीं तेथे आपली अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे आव्हान भाजप अध्यक्ष तानावडे यांनी केले.

मला ब्लू फ्लॅग पेक्षा भगवा फ्लॅग महत्वाचा: मंत्री मिलिंद नाईक

यावेळी मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी बायणा समुद्रकिनारी होणाऱ्या नीळा ध्वज मानांकन (Blue Flag) विषयी विचारले असता या विषयावर माझे मित्र वास्कोचे आमदार आल्मेदा यांना विचारावे. कारण नील ध्वज या मानांकनाविषयी आपल्यापेक्षा अधिक माहिती आल्मेदा (MLA Almeida) यांना असल्याने त्यानीं हा प्रकल्प येत्या पाच महिन्यात पूर्णत्वास घेऊन जावा. तसेच नील ध्वज मानांकन निर्णय मला विचारण्यापेक्षा विरोधकांनी आमदार आल्मेदा याना अधिक विचारल्यास चांगले होईल. बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास व्हावा (Baina Beach Development) हा मुरगाव वास्कोवासियांचे (Vasco) स्वप्न असून ते राज्य सरकार तर्फे गोवा पर्यटन महामंडळ करणार आहे. नील ध्वज मानांकन विषयी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेणार. मला ब्लू फ्लॅग लागत नाही. मला भगवा फ्लॅग लागतो, असे शेवटी मंत्री नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT