Goa Budget Session | Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 'इतकेच' दिवस; विजय सरदेसाई, युरी आलेमाव यांची टीका...

विधानसभा सचिवांची माहिती

Akshay Nirmale

Goa Budget Session : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून सुरू होणार आहे. हे अधिवेश एक आठवडा चालणार असल्याचे यापुर्वी सांगण्यात आले होते. तथापि, आता अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. विधानसभा सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.

फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारच्या या निर्णयावर ट्विटद्वारे टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्याची भीती वाटत होती तेच झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा भाजपने यांनी रामनवमी या दिवसाचा वापर करून घेतला आहे.

त्यादिवशी आता सरकारला प्रश्न विचारता येणार नाहीत. लोकांशी निगडीत मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक जादा दिवस मिळू शकत नाही का? असा सवाल करत एक दिवस येईल, या भित्र्या लोकांना गोव्यातून पळून जावे लागेल, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही सरकारमध्ये विरोधकांचा सामना करण्याची हिंमत नाही. 'राम नाम सत्य है' असे म्हणत ट्विटरवरून टीका केली आहे.

दरम्यान, विधानसभा सचिवांनी बुलेटिनद्वारे दिलेल्या माहितीनुसार आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आता केवळ चारच दिवस चालणार आहे. पुर्वी या अधिवेशनाचा कालावधी 5 दिवस इतका होता, पण त्यातील एक दिवस आता कमी करण्यात आला आहे.

मार्च महिन्यात 30 तारखेला एक दिवस रामनवमीची सुट्टी आहे. त्यामुळे शनिवार, रविवार सोडल्यास फक्त पाच दिवस कामकाजासाठी मिळत होते. पण आता हे अधिवेशन चार दिवसांचेच असेल. म्हणजेच अधिवेशनाचा कामकाज चारच दिवस चालेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT