Goa Cashew उत्पादकांना 'आधार' द्या, काजू उत्पादकांची सरकारकडे आर्त हाक

काजूसाठी आधारभूत किंमत द्या
Cashew Producer
Cashew Producer Dainik Gomantak
Published on
Updated on

Cashew Producer गोव्यात सध्या आंबा-काजू हंगामाला सुरुवात झाली आहे. गोव्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी जनता ही आंबा- काजू सारख्या बहुवार्षिक आणि हंगामी पिकांवर अवलंबून आहे.

सध्याचे बदलत जाणारे वातावरण हे बागायतदारांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच वाढत जाणाऱ्या उन्हामुळे बागायतींना आगी लागण्याच्या घटना देखील घडत आहेत.

या सगळ्या संकटानंतर काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर अजून एक समस्या उभी ठाकली आहे. काजू बी खरेदीचा दर हा सुयोग्य आणि स्थिर असावा अशी मागणी काजू उत्पादकांनी केली आहे. काजूसाठी किमान आधारभूत किंमत वाढवण्याची त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

Cashew Producer
World Wildlife Day 2023 : थोडे थांबा.. आम्हाला जन्मू द्या! कासवांची आर्त हाक

एखाद्या पिकाचा किमान आधारभूत किंमत ठरवताना उत्पादन खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. परंतु तो काही एकमेव घटक नसतो. त्याशिवाय इतर अनेक घटकांचा विचार करून आधारभूत किंमती ठरवल्या जातात.

परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात येणारा उत्पादन खर्च आणि जाहीर होणारी आधारभूत किंमत यात खूप तफावत असल्याने काजूसाठी किमान आधारभूत किंमत वाढवण्याची काजू उत्पदकांनी सरकारकडे मागणी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com