Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोव्यात भात उत्पादनात 9462 मेट्रिक टनांनी वाढ, 'या' तीन तालुक्यातील उत्पादनात घट; कृषीमंत्र्यांची माहिती

Goa Assembly: गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक राज्यातील अनेक मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरत आहेत.

याचदरम्यान आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विधानसभेत विचारेल्या लेखी प्रश्नाला सावंत सरकारमधील कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिलेल्या उत्तरातून एक महत्वाची माहिती समोर आली. राज्यातील भात उत्पादनात 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये 9462 मेट्रीक टनांनी वाढ झाली. परंतु सत्तरी तिसवाडी आणि धारबांदोड या तीन तालुक्यातील भात उत्पादनात घट नोंदवली.

कृषीमंत्री रवी नाईक यांनी आपल्या उत्तराच्या माध्यमातून संपूर्ण आकडेवारी सभागृहासमोर ठेवली. 2022-23 मध्ये उत्तर गोव्यात तब्बल 57712 मेट्रीक टन भाताचे उत्पादन झाले. तर दक्षिण गोव्यात 2022-23 मध्ये 74882 मेट्रीक टन भात उत्पादन झाले होते. हे उत्तर गोव्याच्या तुलनेत अधिक होते.

याशिवाय, 2023-24 मध्ये त्यात 7063 मेट्रिक टनांनी वाढ होऊन 81945 मेट्रीक टन झाल्याचे मंत्री महोदयांनी सभागृहासमोर सादर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT