Goa Assembly Session: सुक्यापेक्षा ओल्या कचऱ्याची आवक; काकोडा जूनमधील स्थिती

Goa Assembly 2024: उत्तर गोव्यातील साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पानंतर दक्षिण गोव्यात काकोडा येथे झालेला दुसरा मोठा कचरा प्रकल्प ठरला आहे.
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, साळगाव कचरा प्रकल्पानंतर दक्षिण गोव्यात काकोडा येथे सुरू झालेल्या कचरा प्रकल्पाचा फायदा निश्‍चित आसपासच्या काणकोण, कुडचडे, धारबांदोडा आणि सांगे भागाला झाला आहे.

सध्या या प्रकल्पात दिवसाला सुमारे ७० टन कचऱ्याची आवक होत असून, गेल्या महिन्यात (जून) सुक्या कचऱ्यापेक्षा चारपटीने ओला कचरा आल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या लेखी उत्तरातील आकडेवरीवरून हे स्पष्ट होत आहे. जून महिन्यात प्रकल्पात ३६४.१ टन सुका कचरा आला. तर चारपटीने अधिक १ हजार २५७.८ टन ओला कचरा आल्याचे नोंदवले आहे.

उत्तर गोव्यातील साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पानंतर दक्षिण गोव्यात काकोडा येथे झालेला दुसरा मोठा कचरा प्रकल्प ठरला आहे. १०० टन कचऱ्यावर दर दिवशी प्रक्रिया होण्याची क्षमता येथे आहे. जून महिन्यात प्रकल्पात ओल्या व सुक्या कचऱ्याशिवाय पालापाचोळा व झाडांचा कचरा ७.३ टन आल्याचेही नोंदीवरून दिसते.

Babush Monserrate
Actor C V Dev Death: दाक्षिणात्य अभिनेते CV देव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहली श्रद्धांजली

अभ्यासासाठी स्थापना

गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाने दिलेल्या माहितीत, वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये २५० टीडीपी इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी (एसडब्ल्यूएमएफ) आणि वेस्ट टू ऊर्जा निर्मिती प्रकल्प करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एसडब्ल्यूएमएफ’ची स्थापना, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट येथील भूसंपादन आणि पर्यावरणीय मूल्यांकन (ईआयए) अभ्यास करण्यासाठी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com