Goa Assembly: सांताक्रुझमध्ये 65 कोटींची कामे पूर्ण: निलेश काब्राल
Goa Assembly: सांताक्रुझमध्ये 65 कोटींची कामे पूर्ण: निलेश काब्राल Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: सांताक्रुझमध्ये 65 कोटींची कामे पूर्ण: निलेश काब्राल

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल, सांतक्रुझ व मेरशी परिसरातील विद्युत पुरवठा (Power supply) सुरळीत करण्यासाठी वीज खात्याने नवीन फिडर व ट्रान्स्फॉर्मरसाठीच्या निविदा काढण्याच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 65 कोटींची कामे करण्यात आली आहेत. ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत, त्याचे काम येत्या दोन महिन्यात सुरू केले जाईल, अशी माहिती आज वीजमंत्री निलेश काब्राल यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिली.

सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ ऊर्फ टोनी फर्नांडिस यांनी सांताक्रुझ परिसरातील वीज समस्येसदर्भातचा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच या भागात भूमिगत वीज वाहिनी घालण्याबाबतचा प्रस्ताव आहे का? गेल्या वादळात सांताक्रुझमध्ये सुमारे 4 दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता. उच्च विद्युत भारीत भूमिगत वाहिन्याचे काम सुरू आहे. सुमारे 800 कोटी रुपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्याचे काय झाले असा प्रश्‍न आमदार फर्नांडिस यांनी केला.

सांताक्रुझ परिसरात फिडर व ट्रान्स्फॉर्मरसाठीच्या निविदासाठी कोणीही सहभागी होत नसल्याने त्या पुढे ढकलाव्या लागत आहेत. सध्या 7 डीटीसी सेंटरसाठीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पुढील पावसाळ्यात फिडरची समस्या होणार नाही. आतापर्यंत सुमारे 65 कोटींच्या निविदांचे काम करण्यात आले आहे. काही निविदा काढण्यात येऊनही कंत्राटदार त्या घेण्यास पुढे आलेले नाहीत त्यामुळे त्या पुन्हा काढण्यात आल्या आहेत, असे उत्तर वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Live News: पिर्ला केपे चिरे खाणीवर धाड; नऊ यंत्रे जप्त

Morjim: लाईट नाही म्हणून मध्यरात्री केला आमदाराला फोन; जीत आरोलकरांची थेट पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT