Asgaon House Demolition Case: पूजा शर्माशी संपर्क; घर पाडतानाच्‍या वेळेची चित्रफीत झाली उघड
Goa Asgaon House Demolition Dainik Gomantak
गोवा

Goa Asgaon: पीडित कुटुंबीय घेणार तक्रार मागे? तपास क्राईम ब्रांचकडे सुपूर्द

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर मोडल्याप्रकरणी तपास आता हणजूण पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) हस्तांतरित करण्यात आला आहे. दरम्‍यान, पीडित कुटुंबीय तक्रार मागे घेत असून, दिल्‍लीतील ‘त्‍या’ बिल्‍डरकडून ते नुकसान भरपाई स्‍वीकारणार आहेत, अशी माहिती रात्री उशिरा सूत्रांकडून प्राप्‍त झाली. मात्र, त्‍या संदर्भात ठोस खातरजमा होऊ शकली नाही.

पूजाने चौकशीसाठी आपण हजर राहू असे पोलिसांना सांगितले आहे. मात्र ती कधी चौकशीसाठी उपलब्ध असेल, याची माहिती तिने पोलिसांना दिलेली नाही. सदर घराची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पथकाने आज पाहणी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल जाहीर केल्यानुसार मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी या प्रकरणात कोण गुंतले आहेत, याविषयीचा अहवाल सरकारला सादर करावयाचा होता, पण तो केलेला नाही. सर्वांच्‍या नजरा सरकारी कारवाईकडे लागल्या आहेत.

आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर मोडण्यामागील सूत्रधार पूजा शर्मा हिला हणजूण पोलिसांनी काल समन्स जारी केले होते. हे समन्स घेऊन हणजूण पोलिस पथक मुंबईला रवाना झाले होते. तिला चौकशीसाठी आज उपस्थित राहण्यासंदर्भातचा उल्लेख त्यात होता.

मुंबईतील पोलिसांच्या मदतीने तिच्या घराचा शोध या पथकाने घेतला, मात्र तिचे घर बंद असल्याचे आढळून आले. फोनवरून पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिने चौकशीस उपस्थित राहू असे सांगितले. मात्र कधी येणार याची माहिती दिलेली नाही. हणजूणचे पथक मुंबईतून परतलेले नाहीत. ते अजूनही मुंबईतच असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

चित्रफीत मिळाली

घर बेकायदा पाडतानाच्‍या वेळेची चित्रफीत आता उघड झाल्याने त्यात दिसणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याचा शोध घेणे पोलिसांना सोपे होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत सांगितले की, कोणताही वरिष्ठ पोलिस अधिकारी यात गुंतला असला तरी त्याची गय केली जाणार नाही. गृहमंत्री म्हणून मी असली कृत्ये खपवून घेणार नाही. गोमंतकीयांची घरे कोणालाही येऊन मोडू दिली जाणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT