मगोचे 12 उमेदवार निश्चित झाले असून आणखी 8 मतदारसंघात उमेदवारांची निवड सुरू असल्‍याचे मगोचे (maharashtrawadi gomantak party) अध्‍यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी सांगितले.  Dainik Gomantak
गोवा

Goa: युतीचे दारे बंदच असल्याने मगोची 20 जागांवर लढण्याची घोषणा

मगोचे 12 उमेदवार निश्चित झाले असून आणखी 8 मतदारसंघात उमेदवारांची निवड सुरू असल्‍याचे मगोचे (maharashtrawadi gomantak party) अध्‍यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

सावईवेरे: भाजप सरकारकडून (BJP Government) सर्वच स्तरावर जनतेची दिशाभूल केली आहे. तरीही त्यांचा सरकारी खर्चाने घरोघरी प्रचार सुरू आहे. अशा पक्षाशी मगोची युती होणार नाही. मगोचे 12 उमेदवार निश्चित झाले असून आणखी 8 मतदारसंघात उमेदवारांची निवड सुरू असल्‍याचे मगोचे (maharashtrawadi gomantak party) अध्‍यक्ष दीपक ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी सांगितले. सावईवेरे येथील श्री सातेरी देवस्थानात प्रचाराच्‍या प्रारंभी ढवळीकर यांनी वरील घोषणा केली.

यावेळी प्रियोळ जि. पं. सदस्य दामोदर नाईक, प्रियोळ गटाध्यक्ष हरिश्‍चंद्र जल्मी, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य - प्रिया च्यारी, दामोदर दिवकर, बाबू च्यारी, आनंद नाईक, विनय नाईक, दिगंबर कुमठेकर, विश्‍वजित नाईक, बाबलो शेट वेरेकर, मोहन वेरेकर, दिलीप शिलकर, हिराश्‍चंद्र नाईक, मनोज गावकर, अनिल वेरेकर व इतर कार्यकर्ते, पदाधिकार उपस्थित होते. राज्यात बाहेरील पक्ष येत आहेत. परंतु या पक्षांचा काहीच परिणाम होणार नाही. मगोचे बालेकिल्ले मजबूत असल्‍याने विजय निश्चित असल्‍याचे ते म्‍हणाले.

नोकऱ्यांचे गाजर

सरकार युवकांना नोकऱ्यांचे गाजर दाखवत असले, तरी प्रत्यक्षात नोकऱ्या कुठे आहेत. 10 हजार नोकऱ्या नाहीतच. त्यातही भेदभाव सुरू आहेत. लवकरच जनतेला सरकारचे खरे स्वरुप दिसणार आहे. निव्वळ धूळफेक सुरू आहे, अशी टीकाही ढवळीकरांनी सरकारवर केली.

जनतेशी संवाद

वेरे, वाघुर्मे, खांडोळा, माशेल, बेतकी, वळवई, तिवरे, केरी, म्हार्दोळ, भोम, बाणास्तारी परिसरात लवकर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मतदारसंघात जनसंवादातून समस्या जाणून घेणार आहे, असे ढवळीकर म्हणाले.

सरकारचे दुर्लक्ष

‘कोविड’ महामारी, वादळ, पावसामुळे ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची शेती नष्ट झाली, कोविडमुळे अनेकांवर संकट कोसळले, अनेकांचे रोजगार गेले. पावसात घरे पडली. अशा ग्रामस्थांना त्वरित मदत द्यायला हवी, पण सरकारने ती दिलेली नाही. सर्वसामान्यांचा विकास करणे, हेच मगोचे पहिले काम असेल. त्यासाठी मगोचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ढवळीकर म्हणाले.

प्रचाराच्‍या प्रारंभी साडेतीनशे कार्यकर्ते

सावईवेरे येथील सातेरी देवस्थान, अनंत देवस्थानात पूजन व गाऱ्हाणे घालण्यात आली. प्रचाराचा नारळ दोन्ही ठिकाणी ठेवण्यात आला. यावेळी आजी-माजी जिल्हा पंचायत सदस्य, पंच, सरपंच, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे 350 कार्यकर्ते उपस्थित होते. सावईवेरेत सातेरी मंदिर परिसर ते अनंत देवस्थानपर्यंत दीपक ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी पूर्ण केली. घरोघरी त्‍यांनी मगो पक्षाच्‍या उमेदवारी कार्डांचे वाटप केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

Dharbandora: 'हे आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले जंगल, इथे IIT नको'! धारबांदोडा ग्रामस्थ ठाम; भूसंपादनास तीव्र आक्षेप

School Paperless Exams: पेपर विरहित परीक्षा घेणारे 'गोवा' ठरेल पहिले राज्य! हेगडेवार विद्यालयात यशस्वी प्रयोग

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

SCROLL FOR NEXT