Arvind Kejriwal Arrested Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Arrest: दिल्लीत घोटाळा, गोव्यात शिमगा

Arvind Kejriwal Arrest: मद्य धोरण : गोव्यातील निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा ‘ईडी’चा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Arvind Kejriwal Arrest: ‘आप’च्या मद्य घोटाळ्यातील पैसे गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा आरोप ‘ईडी’ने न्यायालयात करताच राजकारण तापू लागले आहे.

भाजपचे प्रवक्ते ॲड. यतीश नाईक यांनी अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

या पत्रकार परिषदेत आमदार संकल्प आमोणकर यांनी, २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने प्रचारासाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, या अटकेला राजकीय सुडाची कारवाई संबोधत ‘आप’ने आज मडगाव येथे निदर्शने केली.

यतीश नाईक म्हणाले की, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक झालेल्यांना न्यायालयाने जामीन दिलेला नाही, यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.

केजरीवाल यांनी कोणते आंदोलन केले म्हणून नव्हे, तर गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हे खरे ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आहे.

कायदा मोडणारा कितीही उच्चपदस्थ असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोचणारच, याची हमी या कृतीतून जनतेला मिळाली आहे.

कॉंग्रेस सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत आहे; पण या प्रकरणाचा तपास इतके दिवस सुरू होता, याकडे त्यांचे लक्ष नाही. ही कारवाई एकाच दिवसात झालेली नाही. चौकशीसाठी हजर होत नाही म्हणून त्यांना अटक केली असावी.

सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेस केंद्रात सत्तेवर असताना २०१३ मध्ये सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट करून ठेवले आहे अशी टिप्पणी केली होती, त्याचा सोयीस्कर विसर कॉंग्रेसवाल्यांना पडला आहे.

‘आप’च्या कार्यकर्त्यांनी उगाच गळा काढण्यापेक्षा आमचा नेता चौकशीस सामोरे जाईल, सत्य काय ते बाहेर येईल, असे सांगितले पाहिजे होते. त्यांना त्यांनी काय केले आहे याची पुरती जाणीव असल्याने ते राजकीय कारवाईचा कांगावा करत आहेत.

एजंटांचीही चौकशी करा!

‘आप’ने निवडणुकीत गैरमार्गाने कमावलेल्या पैशांचा वापर बंद करण्यासाठी अशा कठोर कारवाईची आणि सखोल चौकशीची गरज आहे.

दिल्लीतील या चौकशीची व्याप्ती राज्यापर्यंत वाढली पाहिजे. निवडणूक काळात ‘आप’चे एजंट म्हणून काम करणाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे संकल्प आमोणकर म्हणाले.

अण्णा हजारे यांचा शेरा मार्मिक

संकल्प आमोणकर म्हणाले की, ज्या आंदोलनातून ‘आप’चा जन्म झाला, त्या आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी केजरीवाल चुकीच्या मार्गावर चालल्याने त्यांना अटक झाल्याचे म्हटले आहे. हजारे यांच्या या शेऱ्यातच सारे काही सामावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT