BJP MLA Dayanand Sopte and other dignitaries are welcomimg The new president of Mandrem BJP Kisan Morcha Shri. Dattaram Thakur, at Mandrem, Goa. On Saturday 17 July, 2021. Dainik Gomantak
गोवा

Goa: मांद्रे भाजप किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी हरमलचे शेतकरी दत्ताराम ठाकुर यांची निवड

पदाचा योग्य वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावण्याचा प्रयत्न करेन,(BJP Kisan Morcha) दत्ताराम ठाकूर यांचे प्रतिपादन (Goa BJP)

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे (Mandrem) भाजप किसान मोर्चाच्या (BJP Kisan Morcha) अध्यक्षपदी हरमल (Arambol) येथील प्रगतशील शेतकरी (Farmer) दत्ताराम ठाकुर यांची निवड करण्यात आली आहे. मांद्रे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे राज्य किसान (Chif of BJPs Kisan Morcha, Goa state ) मोर्चा प्रमुख वासुदेव गावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून ठाकूर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मांद्रे मतदार संघाचे (Mandrem Constituency) आमदार(MLA) तथा पर्यटन महामंडळाचे (Goa Tourism Corporation) अध्यक्ष श्री. दयानंद सोपटे(MLA Dayanand Sopate),राज्य कार्यकारिणी किसान मोर्चा सचिव उदय प्रभुदेसाई, सदस्य बाबली राऊत,लक्ष्मण कलांगुटकर, भाजप (BJP Goa) मांद्रे मंडळ अध्यक्ष मधू परब आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार श्री वासुदेव गावकर म्हणाले, किसान हा देशाचा कणा आहे. आणि त्याचा सन्मान हा व्हायला हवा. किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजना आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवू असे गावकर यांनी सांगितले. आमदार श्री दयानंद सोपटे यावेळी उपस्थितांना मागर्दर्शन करताना म्हणाले, पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेहनत घेवून कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. तसेच भाजपही शेतकऱ्यांचे हित जपणारा पक्ष आहे व किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन श्री सोपटे यांनी दिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री दत्ताराम ठाकूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे, आपण १९९२ पासून आजतागायत या पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे करीत आलो आहे, त्याचे योग्य फळ आज मला मिळाले असल्याने त्याचा योग्य उपयोग करून शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावण्याचा प्रयत्न करेन, असे ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर सचिव उदय प्रभुदेसाई यांनीही आपले विचार मांडले. तसेच मधू परब यांनी प्रास्ताविक केले, तर सौ.तारा हडफडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT