सांकवाळ जुवारीनगर येथे साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा प्रकल्पाच्या उद्घाटन वेळी उपस्थित मान्यवर
सांकवाळ जुवारीनगर येथे साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा प्रकल्पाच्या उद्घाटन वेळी उपस्थित मान्यवर Dainik Gomantak
गोवा

Goa: कचरा मुक्त करण्यासाठी आवाहन

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गोवा कचरा मुक्त करण्यासाठी राज्यातील पंचायतींना कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. यासाठी जनतेने पंचायतींना तेवढेच सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले.

सांकवाळ पंचायतीतर्फे कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली जुवारीनगर येथे मटेरियल रिकवरी फॅसिलिटी(MRF) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना पंचायतमंत्री गुदिन्हो म्हणाले की, राज्यात वाढत्या कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पंचायतींना कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करणार आहे.सांकवाळ पंचायतीने 'साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा प्रकल्प' उभारून येथील कचऱ्याची समस्या सोडवण्यास पुढाकार घेतल्याने ते अभिनंदनास प्राप्त ठरले असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलीना साल्ढाणा म्हणाल्या की, संपूर्ण कुठ्ठाळीतील कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साकवाळ पंचायती प्रमाणे साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कचरा उघड्यावर टाकल्याने रोगराई होते. यासाठी जनतेने पंचायतींना कचरा देताना ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा असे आवाहन आमदार साल्ढाणा यांनी केले.

साकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर म्हणाले की जुवारीनगर साहित्य प्राप्ती सुविधा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यास पंचायत मंत्री यांचे चांगले सहकार्य लाभले. यापुढे एखाद्याने कचरा उघड्यावर टाकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई (Action)करण्यात येईल. तसेच पंचायतीमार्फत घरोघरी कचरा गोळा करणाऱ्यांना कचरा न दील्यास वीज, पाण्याची जोडणी काढून टाकण्यात येईल अशी माहिती बोरकर यांनी दिली. या कचरा प्रकल्पापासून वीज निर्मीती होणार असल्याची माहिती शेवटी त्याने दिली.

यावेळी कुठ्ठाळीच्या आमदार (MLA)एलिना साल्ढाणा,सांकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर, उपसरपंच श्रीमती सुकोरीना वालीस, पंच श्रीमती सुनिता बोरकर, नरायण नाईक, गिरीश पिल्ले,हरीष कादर, कविता कमल, गोविंद लमाणी,नंदीनी देसाई, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात,मुरगावचे गट विकास अधिकारी प्रसिद्ध नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

Goa Election 2024 Live: गोव्यात सकाळी सात ते अकरापर्यंत 30.90 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT