Tim Draper  Dainik Gomantak
गोवा

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

Meet The Drapers: ड्रेपर यांनी कॉईनबेस, बैदू, हॉटमेल, स्काईप, टेस्ला, स्पेस एक्स आणि ट्वीटर यासारख्या कंपनीत गुंवतणूक केली आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील एका नव्या उद्योगाची 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली. गोवा पर्यटनाची माहिती देणाऱ्या Goa App च्या संस्थापकांना अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये हजेरी लावण्याची संधी मिळाली. उद्योगाच्या संस्थापकांनी प्रसिद्ध गुंतवणुकदार टीम ड्रेपर यांच्यासमोर उद्योग समजावून सांगितला खरा पण, त्यांना फायनलपर्यंत मजल मारता आली नाही.

Goa App या गोव्यातील पर्यटनाची माहिती देणाऱ्या App ची निर्मिती साखळीच्या राधाप्रसाद बोरकर (३२) आणि निळकंठ शेट शिरोडकर (३२. रा. साखळी) यांनी केली आहे. अलिकडेच दोघांनी "मीट द ड्रेपर" या टीम ड्रेपर यांच्या अमेरिकन शोमध्ये हजेरी लावली. बोरकर आणि शिरोडकर यांनी Goa App ची संकल्पना, उत्पन्न आणि इतर बाबींची माहिती शोमध्ये दिली. पण, त्यांना गुंतवणूक मिळवण्याच्या शर्यतीत टीकता आले नाही.

शार्क टँकच्या धर्तीवरच मीट द ड्रेपर नावाचा शो अमेरिकत सुरु आहे. यात प्रसिद्ध गुंतवणूकदार टीम ड्रेपर विविध उद्योगात गुंतवणूक करतात. यापूर्वी ड्रेपर यांनी कॉईनबेस, बैदू, हॉटमेल, स्काईप, टेस्ला, स्पेस एक्स आणि ट्वीटर यासारख्या कंपनीत गुंवतणूक केली आहे. उद्योगांना या कार्यक्रमात एक मिलियन डॉलर (8,43,92,900 भारतीय रुपये) पर्यंत गुंतवणूक मिळवण्याची संधी असते.

गुंतवणुकीसाठी आम्ही गोवा सरकारकडे पीच केलं होतं पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अशाप्रकारे कधीच पीच केलं नव्हतं. मोठ्या गुंतवणुकीसाठी हा आमचा पहिलाच प्रयत्न होता. आमचं सिलेक्शन झाले नाही पण, जागतिक पातळीवर App चे प्रमोशन आमचे ध्येय होतं. लोकांना माहिती व्हायला हवं की असं App उपलब्ध आहे, असे संस्थापक राधाप्रसाद बोरकर म्हणाले.

याशिवाय याच शोमध्ये समारो (Samaaro) या फातोर्डातील कंपनीने देखील गुंतवणुकीसाठी शोमध्ये पीच सादर केले. दरम्यान, त्यांच देखील अंतिम फेरीसाठी निवड झाली नाही. शोमधील ड्रेपर यांच्याशी झालेला संवाद प्रेरणादायी होता, असे मत पूर्णांक प्रकाश यांनी नोंदवले. समारो इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एआयचा वापर यावर आधारीत कंपनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

SCROLL FOR NEXT