Anmod Ghat Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांसाठी अनमोड घाट बंद; पर्यायी मार्ग जिल्हाधिकाऱ्यांनी केले जाहीर

Anmod Ghat Road:- बेळगांव आणि गोव्याला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग असून दररोज हजारो वाहन या मार्गाने ये- जा करीत असतात.

Ganeshprasad Gogate

Anmod Ghat Road:- अनमोड घाट मार्ग दिनांक 5 ते 25 जानेवारीपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलाय. रेल्वे विभागाच्या डबलिंग कामासाठी मार्ग बंद असेल असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय.

लघु वाहनांना जाण्यासाठी रामनगर ,तिनेघाट, मार्संगाळ तर येण्यासाठी अनमोड, कॅसरलॉक, चांदेवाडी जगलबेट मार्ग देण्यात आला आहे. अवजड वाहनांना अळणावर- हल्ल्याळ -यलापूर मार्ग देण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

ट्राफिक जामची समस्या:-

अनमोड घाट हा बेळगांव आणि गोव्याला जोडणारा महत्वाचा घाटमार्ग असून दररोज हजारो वाहन या मार्गाने ये- जा करीत असतात. मागील आठवडाभरापूर्वी एका ट्रॉलीमुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

तसेच काही महिन्यांपूर्वी अनमोड ते रामनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्यानेही वाहनचालकांना कसरत करावी होती.

प्रवेश शुल्क:-

गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांना अनमोड तपासणी नाक्यावर प्रवेश शुल्क भरावे लागत असून कर्नाटक वन खात्याने व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय वन्यजीव उद्यानातून जाणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारणी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT