Goa Anganwadi Workers Dainik Gomantak
गोवा

Anganwadi: खुशखबर! अंगणवाडी सेविकांना 2 हजार, मदतनिसांना मिळणार 1 हजार वाढ

Anganwadi Workers Salary: महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याने राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्‍या मासिक मानधनात वाढ करण्‍यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: विधानसभेच्‍या गत पावसाळी अधिवेशनात दिलेल्‍या आश्‍‍वासनानुसार महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याने राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्‍या मासिक मानधनात वाढ करण्‍यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.

सेविकांच्‍या मानधनात प्रत्येकी दोन हजार आणि मदतनिसांच्‍या मानधनात प्रत्‍येकी एक हजार रुपयांची वाढ करण्‍याचा प्रस्‍ताव खात्‍याने सरकारला सादर केला असून, सरकारच्‍या मान्‍यतेनंतर लगेचच या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती खात्‍याच्‍या सूत्रांनी सोमवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

राज्‍यात सध्‍या १,२६२ अंगणवाड्या असून, त्‍यात तितक्‍याच सेविका कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना सरकारकडून एकरकमी रक्कम देण्‍यात येते. परंतु, त्‍यांना मासिक पेन्‍शन देण्‍यात येत नाही.

निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना मासिक पेन्‍शन मिळावी, यासाठी अखिल गोवा अंगणवाडी सेविका संघटना गेल्‍या काही वर्षांपासून प्रयत्‍न करीत आहे. परंतु, सरकारने अद्याप त्‍यांची मागणी मान्‍य केलेली नाही. सरकारकडून ही मागणी मान्‍य करून घेण्‍यासाठी आपले विविध मार्गांनी प्रयत्‍न सुरू असल्‍याचे संघटनेच्‍या अध्‍यक्ष सुनिता मुळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT