Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची बातमी! निवृत्ती वय केले 62; 25 वर्षांनंतर स्‍वेच्‍छानिवृत्ती शक्य

Goa Anganwadi Retirement: राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्‍या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्‍यात आले आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना तंदुरुस्‍ती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
Goa Anganwadi Workers
Goa Anganwadi WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्‍या निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्‍यात आले आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना तंदुरुस्‍ती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. २५ वर्षांची सेवा पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना स्‍वेच्‍छानिवृत्ती घेता येणार असून, अशा सेविका आणि मदतनीसांना अनुक्रमे ५ लाख आणि ३ लाखांचे पूर्ण निवृत्तीवेतन मिळणार आहे.

महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक ज्‍योती देसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी यापूर्वी निवृत्तीचे वय ६० वर्षे निश्‍चित करण्‍यात आले होते. परंतु, ते आता दोन वर्षांनी वाढवून ६२ इतके करण्‍यात आले आहे.

यापूर्वी स्‍वेच्‍छानिवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम मिळत नव्‍हती. परंतु, यापुढे २५ वर्षांची सेवा पूर्ण केल्‍यानंतर त्‍यांनी स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतल्‍यास त्‍यांना अनुक्रमे पाच आणि तीन लाखांचे पूर्ण निवृत्तीवेतन मिळेल, असे अधिसूचनेत म्‍हटले आहे.

दरम्‍यान, राज्‍यात सध्‍या १,२६२ अंगणवाड्या कार्यरत असून, त्‍यामध्‍ये १,२९४ सेविका, तर १,२४८ मदतनीस कार्यरत आहेत. उर्वरित जागा भरण्‍याची प्रक्रिया सरकारने काही महिन्‍यांपासून सुरू केली आहे.

Goa Anganwadi Workers
Anganwadi Workers Protest: राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी एकवटले

तीन महिन्‍यांची नोटीस सक्‍तीची

स्‍वेच्‍छा निवृत्तीसाठी अर्ज केलेल्‍या सेविका आणि मदतनीसांना तीन महिन्‍यांची नोटीस सक्तीची राहणार आहे. वैद्यकीय कारणासाठी स्‍वेच्‍छानिवृत्ती घेत असलेल्‍या सेविका, मदतनीसांनी नोटीस देण्‍यास नकार दिल्‍यास त्‍यांची विनंती मान्‍य केली जाईल. शिवाय अनपेक्षितरित्‍या सेविका आणि मदतनीसांचा मृत्‍यू झाल्‍यास त्‍यांच्‍या निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम वारसदारांना देण्‍यात येईल, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

Goa Anganwadi Workers
Canacona Anganwadi: गावडोंगरीतील अंगणवाडीची दुर्दशा! गळक्या छतामुळे विद्यार्थी भीतीच्या छायेत

आता पेन्‍शनसाठी प्रयत्‍न : मुळगावकर

सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीनंतर एकरकमी रक्कम देण्‍यात येते. परंतु, पेन्‍शन दिली जात नाही. निवृत्तीनंतर सेविका आणि मदतनीसांना पेन्‍शन सुरू करावी, अशी मागणी त्‍यांच्‍याकडून अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु, सरकारने अद्याप त्‍यांची ही मागणी मान्‍य केलेली नाही. आगामी काळात ही मागणी पूर्ण करून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येतील, अशी माहिती राज्‍य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्‍या अध्‍यक्ष सुनीता मुळगावकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com