Protest Dainik Gomantak 
गोवा

Goa Anganwadi: ‘त्या’ सातही कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या

अंगणवाडी संघटनेची मागणी: बुधवारपासून आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

दैनिक गोमन्तक

फोंडा: काँग्रेस समर्थक ॲड. ह्रदयनाथ शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी कामगार संघटनेने आंदोलन केले आणि मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला असा ठपका ठेवत राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याने सात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. येत्या सोमवार 9 तारखेपर्यंत या सातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा बुधवारी 11 तारखेपासून पणजीतील आझाद मैदानावर साखळी उपोषण छेडण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

फोंड्यात अंगणवाडी कर्मचारी संघटना गोवातर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड. ह्रदयनाथ शिरोडकर तसेच देवयानी तामसे, विद्या नाईक, रश्‍मिता नाईक, पौर्णिमा गावकर, ज्योती सावर्डेकर, ज्योती केरकर व खतिजा अथनेकर आदी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

निवडणुकीपूर्वी अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन झाले होते. त्यावेळेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संघटनेच्या काही मागण्या मान्य करून आंदोलनकर्त्या एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, आता थेट या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले असल्याने सरकारचा हा कुठला कायदा असा सवाल करण्यात आला आहे.

काँग्रेस आणि निवडणुकीचा संबंध एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यासाठी लागतो काय, असा सवाल करून ही पोर्तुगीज सालाझारशाही चालली असल्याचा आरोपही करण्यात आला. येत्या सोमवारपर्यंत सातही कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, अन्यथा बुधवारपासून सातही कर्मचारी साखळी आंदोलन छेडणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ह्रदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

Horoscope: गुप्त शत्रूंकडून सावध राहा, कामात संयम ठेवा आणि निर्णय घाईत घेऊ नका; तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

SCROLL FOR NEXT