Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa's Top News: गोमेकॉत डॉक्टरला धक्काबुक्की, बेतोडा अपघातात एक ठार; राज्यातील ठळक बातम्या

Goa Today's 25 May 2024 Live News Breakings: गोव्यातील दिवसभरातील गुन्हे, राजकारण, क्रीडा, कला, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

विवांता जंक्शन ते शीतल हॉटेल, काकुलो मॉल आणि मधुबन जंक्शन रस्त्याचे काम पूर्ण

विवांता जंक्शन ते शीतल हॉटेल, शीतल हॉटेल ते काकुलो मॉल आणि शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन या रस्त्याचे काम पूर्ण. २८ मे रोजी रात्री नऊनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार.

थिवी येथे प्रवाशांची तपासणी, दहाजण अटकेत

समाजविघातक कृत्ये रोखण्यासाठी उत्तर गोवा पोलिसांची थिवी रेल्वे स्थानकावर विशेष मोहीम, प्रवाशांची तपासणी करत 10 जणांना केली अटक.

बेतोडा येथे कार व दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

बेतोडा येथे स्कोडा कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार दुसऱ्याचा पाय फॅक्चर. फोंडा पोलीस अपघातस्थळी दाखल. जखमी उपचारासाठी फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल.

Goa Accident Case

आता गोव्यात २४ तास वीज तक्रार निवारण कक्ष

वीजेच्या समस्येवर आता गोव्यात २४ तास तक्रार निवारण कक्ष लवकरच कार्यरत राहणार असल्याची माहिती वीज खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली आहे. या कक्षातील सीसीटीव्हीचे थेट प्रेक्षेपण ओएसडी आणि सीई आणि एसई यांना असेल, असे ढवळीकरांनी सांगितले.

सत्तरीतील अपघातात युवती गंभीर जखमी

Goa Accident

वेळूस- ठाणे रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात. अपघातात ठाणे सत्तरीची युवती पुजा संजू नाईक गंभीर जखमी.

Goa Accident

चिंबल येथे भाडेकरू पडताळणी मोहिमेत आठजण कागदपत्रांशिवाय आढळले.

चिंबल येथे भाडेकरू पडताळणी मोहिमेत ८ जण कागदपत्रांशिवाय आढळले. कोणत्याही कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे भाड्याने राहणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पुढील वर्षीच्या प्रेरणा दिनापूर्वी आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा... - गावडे

पुढील वर्षीच्या प्रेरणा दिनापूर्वी आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार राहा, असा गर्भीत इशारा मंत्री गोविंद गावडे यांचा आपल्याच सरकारला दिला आहे. अधिकाऱ्यांना काम करण्यास जमत नसेल तर त्यांनी घरी बसावे. प्रत्येक सरकारने आदिवासी समाजाचा वापर केल्याचा आरोपही गावडेंनी यावेळी केला.

गोमन्तकीय पंकज नार्वेकरने सर केले माऊंट एव्हरेस्ट शिखर

Pankaj Narvekar Climb Mount Everest

जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा पंकज नार्वेकर (पर्वरी) ठरला पहिला गोमन्तकीय. पंकज बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. २१ मे रोजी त्यांने शिखर सर करत इतिहास रचला.

Pankaj Narvekar Climb Mount Everest

गोमेकॉतील डॉक्टरला धक्काबुक्की, मारहाण करण्याचा प्रयत्न

GMC

गोमेकॉतील डॉक्टरला धक्कबुक्की करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हापसा येथील एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वादळग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Goa Unseasonal Rain

न्हावेली साखळीतील मस्तेवाडा, कातरवाडा व पाऊलवाडा येथे चक्री वादळात झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री.

CM Pramod Sawant

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT