Goa And Konkan Live News | Arvind Kejriwal
Goa And Konkan Live News | Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Goa And Konkan News: दिवसभरातील ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

Pramod Yadav

पुन्हा ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’! भरधाव कार दुचाकीला धडकून रेस्टॉरंटमध्ये शिरली

वास्कोजवळील सेंट अँड्र्यूज चर्च नजीक ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा थरार. मद्यधुंद अवस्थेतील पर्यटक टॅक्सीचालकाची पार्क केलेल्या बाईकला धडक बसून ही कार नजीकच्या रेस्टॉरंटमध्ये घुसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रेस्टॉरंटच्या छताचा खांब आणि शटर मोडून पडले. सुदैवाने रेस्टॉरंट बंद असल्याने जीवित हानी टाळली.

महत्वाची बातमी! अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’कडून अटक

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’कडून अखेर अटक; मद्यधोरण प्रकरणी लाच घेतल्‍याच्‍या आरोपाअंती सुरू होती चौकशी. सक्‍त वसुली संचालनालयाने आज बजावला होता दहावा समन्‍स.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या प्रयत्नाने जीवदान

बालिकेसह पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला डिचोली पोलिसांनी वाचवले. सदर महिला उत्तरप्रदेशमधील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त. गुरुवारी सायंकाळी घडली घटना.

मडगाव सर्व्हेअर मारहाण प्रकरणातील आरोपीची ओळख पटली

मडगाव भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्य सर्व्हेअर प्रसाद सावंत देसाई यांना मारहाण करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून ती व्यक्ती रॉडनी सॅव्हियो ऑलविन गोम्स असल्याचे समोर आलेय. तो फातोर्डा येथील रहिवासी असून सध्या तो फरार आहे.

सदानंद शेट तानावडे यांच्यावर कारवाई करा; अमित पाटकरांचे निवडणूक आयोगाला निवदेन

Goa Congress

राहुल गांधींनी ऐतिहासीक शिवतीर्थावरील सभेत 'हिंदू धर्मातील शक्ती'चा उल्लेख केला. महाभारतात पांडव आणि कौरवांची शक्ती आहे आणि रामायणात श्रीराम आणि रावणाची शक्ती आहे.

राहुल गांधी 'सत्याच्या शक्ती'च्या बाजूने आहेत. भाजप आणि सदानंद शेट तानावडे यांना फक्त 'असत्याची शक्ती' माहित असावी - भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याबाबत वक्तव्य केले.

Goa Congress

सत्तरीत दुचाकीला आग, 50 हजारांचे नुकसान

नगरगाव आंबेडे सत्तरी येथील कुंबळीची घाट येथे धावत्या दुचाकीला आग लागल्याने 50 हजारांचे नुकसान, म्हाऊस येथील शरद गावकर थोडक्यात बचावला.

भाजपची तिसरी यादी जाहीर, दक्षिण गोव्याच्या उमेदवाराचा समावेश नाही

BJP Loksabha Candidate Third List

भाजपची तिसरी यादी जाहीर झाली असून, यात देखील दक्षिण गोव्यातील उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे उमेदवारासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

BJP Loksabha Candidate

Dabolim News: आठव्या मजल्यावरुन कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू

जयराम नगर, दाबोळी येथे आठव्या मजल्यावरुन कोसळून कर्मचाऱ्याचा मृत्यू. वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु.

Goa News

50 लाखांची मद्य तस्करी, गोव्यातील डिस्टीलरी संचालकासह वाईन शॉप मालकास अटक

पन्नास लाख रुपयांच्या मद्य तस्करी प्रकरणी , गोव्यातील डिस्टीलरी संचालकासह वाईन शॉप मालकास अटक करण्यात आलीय. गुजरातच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

Liquor smuggling crime news

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकास अटक

Goa Crime News

फातोर्डा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मोहिद्दिन शेख उर्फ इरफान शेख (१९, दिकरपाल, सासष्टी) याला अटक करण्यात आली आहे.

Goa Crime News

Panjim News: येत्या 27 मार्चला पणजी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक

Panjim Muncipal Corporation

पणजी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक येत्या 27 मार्च रोजी होणार आहे. विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात व उपमहापौर संजीव नाईक यांची पुनर्निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Panjim Muncipal Corporation

सत्तरीतील केरी शिरोली भागात गव्या रेड्यांचा धुमाकुळ

Sattari Keri

सत्तरीतील केरी शिरोली भागात गेल्या अनेक दिवसांपासून गव्या रेड्यांचा धुमाकुळ, भात शेती बरोबर आता काजू बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधुस, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण.

Sattari Keri

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT