Amthane Mencure Road Car Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: सहलीवरून परतणाऱ्या युवकांच्या कारचा चक्काचूर, आमठाणे -मेणकुरेदरम्यान भीषण अपघात; सुदैवाने सहाही जण सुखरूप

Amthane Mencure Road Car Accident: कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा युवक सुदैवाने बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी आमठाणे-मेणकूरेदरम्यान घडला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा युवक सुदैवाने बचावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी आमठाणे-मेणकूरेदरम्यान घडला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातून सुखरूप बचावलेले युवक बार्देश भागातील असल्याची माहिती मिळाली आहे.

बार्देशमधील सहा युवकांचा एक गट सहलीसाठी आमठाणे येथील फार्मवर गेला होता. तेथे मौजमजा करून सायंकाळी युवकांचा गट कारमधून आमठाणे-मेणकूरेमार्गे म्हापशाच्या दिशेने निघाला होता. आमठाणे जलाशयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील एका छोट्या वळणावर हा अपघात घडला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन गुलमोहराची झाडे आणि संरक्षक खांबांना धडकली. त्यानंतर कार दहा मीटर अंतरापर्यंत पलटी खात जाऊन कठड्याला अडकून थांबली.

दैव बलवत्तर म्हणून...!

अपघाताची तीव्रता आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता कार भरधाव वेगात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात पलटी होण्यापूर्वी कार विजेच्या खांबाला धडक देता-देता बचावली. त्याचवेळी समोरून दुसरे वाहन आले असते, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. या भीषण अपघातातून सुखरूप बचावलेले सहाही युवक प्रचंड घाबरले होते. आमठाणे-मेणकूरेमार्गे वजरीला जोडणाऱ्या रस्त्यावर सहलीसाठी येणाऱ्या वाहनांचा वेग अनेकदा नियंत्रणाबाहेर असतो. काहीवेळा वाहनचालक मद्यधुंद अवस्थेतही वाहन चालवत असल्याने अशा अपघातांना आमंत्रण मिळते, असे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT