पणजी: राज्यातील रुग्णवाहिका सेवा योग्य पद्धतीने चालत नसल्याचा दावा करीत, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) वीरेश बोरकर गटाने आरोग्य खाते आणि रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या ‘जीव्हीके’ला निवेदन सादर केले. तसेच आपत्कालीन आरोग्य सेवेतील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शविना नाईक शिरोडकर, उपाध्यक्ष विपिन नाईक, सरचिटणीस मेल्विन डिसिल्वा, सरचिटणीस प्रेमानंद गावडे आदी उपस्थित होते. ‘‘सरकार विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु आपत्कालीन आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष करीत आहे.
जेव्हा एखाद्याचा जीव धोक्यात असतो, तेव्हा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा कार्यक्षम असणे महत्त्वाचे आहे, परंतु सध्या अशा अनेक प्रकरणांत रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे या सेवेत सुधारणा आणण्याची मागणी आम्ही आरोग्य खात्याकडे केली आहे’’, असे आमदार बोरकर म्हणाले.
‘‘गोव्याच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित या मूलभूत आणि महत्त्वाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आम्ही आरोग्य खाते आणि ‘जीव्हीके’ला निवेदन सादर केले आहे. सरकार आणि संबंधित अधिकारी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर आवश्यक सुधारात्मक पावले उचलतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे’’, असे विपिन नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.