Freddy Svane Dainik Gomantak
गोवा

Ambassador Of Denmark In Goa: ''गोव्याची संस्कृती आदर्शवत, तिचे रक्षण आपले कर्तव्य'', राजदूत फ्रेडी स्वॅन यांचे उद्गगार

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन ः बलराम निवासी शाळेत जल्लोषात स्वागत

गोमन्तक डिजिटल टीम

Ambassador Of Denmark In Goa: शिक्षणाशिवाय सध्या पर्याय नाही. श्रम करून आरोग्य सांभाळले पाहिजे. देश पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांनी काम करणे आवश्यक आहे.

गोव्याची संस्कृती आदर्शवत आहे. संस्कृतीचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे उद्‍गार डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वॅन यांनी काढले.

डेन्मार्कच्या राजदूतांचे आमोणे - काणकोण येथील बलराम निवासी शाळेत आज सकाळी ११ च्या दरम्यान आगमन झाले. मुख्याध्यापिका सविता तवडकर, संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर यांनी त्यांचे स्वागत केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रमुख पाहुणे फ्रेडी स्वॅन यांनी केले. या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर, विशेष निमंत्रित म्हणून डॉ. त्रिपाठी, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अंकुश गावकर, मुख्याध्यापिका सविता तवडकर, प्रभारी मुख्याध्यापिका, शिक्षक, स्थानिक सरपंच आनंदू देसाई, द. गो. उपाध्यक्ष महेश नाईक, जैवविविधता व्यवस्थापन समिती श्रीस्थळचे अध्यक्ष विनय तुबकी, पंच सदस्य व अन्य उपस्थित होते‌‌.

अंकुश गावकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शाळेच्या शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये नृत्य सादरीकरण, योगा सादरीकरण, फुगडी, कळशी नृत्य, झारखंडचे प्रसिद्ध कुणबी नृत्य सादर केले.

हे नृत्य पाहून राजदूत स्वॅन यांनी नृत्यामध्ये स्वत: सहभागी होऊन‌ नृत्य केले. सभापती तवडकर व सविता तवडकर यांनीही त्यांना साथ दिली. विशेष निमंत्रित डॉ. त्रिपाठी यांनी डेन्मार्कचे राजदूत गोव्याला तसेच काणकोणला विशेष करून विकासकामांत मदत करणार असल्याचे सांगितले.

या ठिकाणी ग्रामीण संस्कृतीसंबंधी कार्यक्रम, आरोग्यासंबंधी चर्चा व आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन राजदूत स्वॅन यांच्या हस्ते करण्यात आले.

कृषी, दुग्ध, मत्स्यपालन या क्षेत्रात डेन्मार्क देशाने अनन्यसाधारण प्रगती याआधीच केली आहे. त्यादृष्टीने या भेटीला बरेच महत्त्व आहे.

श्रम-धाम योजनेतील घरांची पाहणी

संध्याकाळी राजबाग येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रम-धाम संकल्पनेतून साकारलेल्या घरांचे सादरीकरण व प्रमुख 50 कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला. फ्रेडी स्वॅन यांनी यावेळी श्रम-धाम संकल्पना समजून घेतली.

त्यानंतर या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या अर्धफोंड येथील हरिश्चंद्र नाईक, तारीर येथील प्रिती, आगोंद काराशीरमळ येथील विनंती वेळीप व‌ धवळखाजन येथील सुजाता पागी यांच्या घरांना प्रत्यक्ष भेट पाहणी केली आणि या उपक्रमाचे कौतुक केले.

डेन्मार्ककडून गोव्याला होणार मदत

सभापती तवडकर यांनी आपल्या भाषणात काणकोण व्हिजन आणि मिशन अंतर्गतच्या उपक्रमांना डेन्मार्कचे राजदूत मदत करणार आहेत. पर्यटन क्षेत्रातसुद्धा ते गोव्याला मदत करणार आहेत. श्रम-धाम अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरासंबंधीही त्यांनी उत्सुकता दाखवली आहे, असे सांगितले.

मल्लिकार्जुन देवस्थानला भेट

काणकोणच्या दौऱ्यावर असलेल्या डेन्मार्कच्या राजदूतांनी येथील प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन देवस्थानला सदिच्छा भेट देऊन या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात केली. या ठिकाणी देवस्थान समिती अध्यक्ष विठोबा देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT