Aldona MRF Shed Dainik Gomantak
गोवा

Aldona MRF Shed: 'आम्ही मागे हटणार नाही'; साईनगर व रामतळे ग्रामस्थांचा MRF शेडविरोधात पुन्हा एल्गार

Aldona MRF Shed: MRF शेडच्या बांधकामाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Ganeshprasad Gogate

Aldona MRF Shed: हळदोणा बार्देझ येथील सुरु असलेल्या MRF शेड बांधकामासंदर्भात कोमुनिनाद प्रशासनाने हळदोणा पंचायतीला रामतळे येथे चाललेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले. याचसंदर्भात साईनगर आणि रामतळे गावातील नागरिकांनी एकत्र येत MRF शेडच्या बांधकामास विरोध दर्शवण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केलीय.

गेले 8 दिवस येथील ग्रामस्थांनी शेडच्या बांधकामाला कडाडून विरोध केला त्यामुळे या प्रकरणातील संबंधित लोकांच्या घरावर सरपंचांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या नोटिसा काढल्या आहेत.

मात्र या असल्या प्रकाराला आम्ही घाबरणार नाही. आम्हाला आमच्या घरासोबतच मंदिरही महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार उपस्थितांनी केलाय.

सध्या बांधकामावर 2 दिवसांची स्थगिती आल्याने सरपंचांसह संबंधित टीमहवालदिल झाली आहे. सरपंच आणि वोर्ड मेंबर खोटं बोलतं असून ही सर्व प्रक्रिया कायदेशीर करण्यासाठी त्यांची धावाधाव सुरु झाली आहे.

मात्र आम्हीही मागे हटणार नसून सध्या आमच्या बाजूने लढण्यासाठी 2 वकील असून आणखी 2 हायकोर्टचे वकील देण्याचीही आमची तयारी आहे.

या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आमदारांनी प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल न होता केलेल्या वक्तव्यामुळे महिला ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली सल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर उपस्थित महिला ग्रामस्थांनी सुद्धा आपले म्हणणे पत्रकारांसोबत पोटतिडकीने मांडले.

आम्ही गरीब असून आम्हाला त्रास देऊ नका. आमच्या मुलकांना याचा त्रास नकोय. आम्हाला जीवे मारण्याच्या, आमची घर मोडण्याच्या धमक्या देऊ नका अशी आर्त विनवणी यावेळी उपस्थित महिला ग्रामस्थांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratapgad Fort: 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

Womens World Cup 2025 Final: टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

Honeymoon Destinations: गोव्याच्या किनाऱ्यावर रोमान्स, दुबईची 'लक्झरी' लाईफ! हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 10 'रोमँटिक' ठिकाणं, कपल्सची आहे पहिली पसंती

Salim Ali Bird Sanctuary: नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman: खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

SCROLL FOR NEXT