Turmeric Production Dainik Gomantak
गोवा

Turmeric Production In Goa: हळदीला सुवर्णकाळ! राज्यात उत्पादन वाढणार, शास्त्रज्ञांद्वारे प्रयोग सुरु

शास्त्रज्ञांचे प्रयोग सुरू : उपपदार्थ निर्मितीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

राज्यात हळदीचे उत्पादन वाढीस लागावे यासाठी आयसीएआरच्या केंद्रीय किनारी कृषी संशोधन केंद्रात विविध प्रयोग सुरू आहेत. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उपपदार्थ बनवण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती संचालक डॉ. परवीन कुमार यांनी दिली आहे.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दैनंदिन लागणारा घटक म्हणजे हळद. अर्थात आयुर्वेदामध्येही अनेक औषधांमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी राज्यातील हळद उत्पादनाचे प्रमाण वाढावे याकरता केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्रात विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत.

कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी मोफत बियाणे, लागवड संगोपन, काढणी, योग्य साठवणूक यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

राज्यातील प्रामुख्याने सत्तरी, सांगे, काणकोण, डिचोली, पेडणे, फोंडा आणि तिसवाडी तालुक्यात विविध शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले असून त्याला आता चांगल्या प्रकारचे यश येत आहे, अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली आहे.

आंबेहळद, काळी हळद लागवड

आयुर्वेदानुसार दैनंदिन जीवनात हळद योग्य प्रमाणात वापरल्यास त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो, हे सिद्ध झाले आहे.

मात्र, आयुर्वेदिक औषधांमध्ये आंबेहळद आणि काळी हळद मोठ्या प्रमाणात वापरली जाते. राज्यात अनेक शेतकऱ्यांकडून अशाप्रकारची हळद लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन

हळद उत्पादनानंतर त्यापासून उपपदार्थ तयार करणे, हळद तयार करणे, त्याची योग्य साठवणूक आणि बाजारपेठ निर्माण करणे यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. प्रामुख्याने केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीकरिता (एसटी) मोफत हळद बियाणे, मार्गदर्शन ते हळद निर्मिती यंत्रांचा पुरवठा केला जात आहे.

सेलम, पितांबरीला मोठी मागणी

राज्यात पडणारा अतिरिक्त पाऊस आणि इतर दमट हवामान हळदीसाठी पोषक ठरत आहे. या वातावरणात सेलम, प्रतिभा, वायगाव, पितांबरी या प्रजातीच्या हळदी लावल्या जात असल्या तरी सेलम आणि पितांबरीला चव, टिकाऊपणा, पिवळा रंग यामुळे मोठी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

अग्रलेख: शनिवारची रात्र ठरली भयाण किंकाळ्यांची! हडफडे अग्निकांडाने उफळला संताप, 25 बळींचा हिशोब कोण देणार?

Arpora Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेला कायदेशीर वळण! 'एसआयटी' चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल; 16 डिसेंबरला सुनावणी

वास्कोत भररात्री गोंधळ! प्रार्थनास्थळी दानपेटी फोडली, मूर्तीचे नुकसान, अंतर्वस्त्रे घालून फिरणाऱ्या व्यक्तीवर संशय; कोण आहे हा 'अर्धनग्न' संशयित?

Goa Live Updates: 'त्या' अधिकार्‍याला अटक होणार

SCROLL FOR NEXT