Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Goa Paddy Farming: मांद्रे आणि कोरगाव गावांच्या हद्दीवरील सुमारे २० एकर क्षेत्रातील भातशेती यंदा नेहमीपेक्षा तब्बल दीड महिना लवकर कापणीसाठी तयार झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: मांद्रे आणि कोरगाव गावांच्या हद्दीवरील सुमारे २० एकर क्षेत्रातील भातशेती यंदा नेहमीपेक्षा तब्बल दीड महिना लवकर कापणीसाठी तयार झाली आहे. मात्र, शासनाच्या अनुदानातून उपलब्ध होणाऱ्या हार्वेस्टिंग मशिनचे तालुकास्तरीय नियोजन अद्याप झालेले नसल्याने शेतकऱ्यांसमोर पीक वेळेत कापण्याचे संकट उभे राहिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून भात कापणी व मळणीसाठी शासनाच्या अनुदानातून हार्वेस्टिंग मशीन उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे कापणीसाठी लागणारा वेळ आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. तालुक्यातील शेतकरी संस्था किंवा संबंधित संस्थांच्या माध्यमातून या यंत्रांचे नियोजन केले जाते. साधारणपणे भातशेती पिकण्याच्या कालावधीचा अंदाज घेऊन संबंधित संस्थांची बैठक घेतली जाते आणि गावनिहाय यंत्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाते.

यंदा सावंतवाडा-मांद्रे आणि पेठेचावाडा-कोरगाव हद्दीवरील मळ्यातील भात नेहमीपेक्षा सुमारे दीड महिना लवकर कापणीसाठी तयार झाले आहे. तालुक्यातील अन्य भागांतील भात पीक अद्याप तयार झाले नसल्याने हार्वेस्टिंग मशीनचे नियोजन होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्‍याची भीती व्‍यक्त केली जात आहे.

मशीन उपलब्‍ध झाले नाही तर मजूर आणावे लागतील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कापणी करावी लागेल. मात्र, सध्या शेतीच्या कामासाठी मजूर मिळणे आणि वाढलेली मजुरी परवडणे, ही देखील शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या ठरत आहे.

भातशेतीचा हंगाम सर्व भागांत एकाच वेळी येत नसल्याने लवकर पिकणाऱ्या भागांसाठी शासनाने स्वतंत्र किंवा तात्पुरती कापणी यंत्राची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सरकारने तातडीने व्‍यवस्‍था करावी

आमच्या भागातील भात पीक नेहमीपेक्षा खूप आधी तयार झाले आहे. हार्वेस्टिंग मशीनचे नियोजन होईपर्यंत वाट पाहिली तर पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. केवळ आमच्या शेतीसाठी मशीन आणणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे शासनाने अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

...तर पुन्‍हा कोयतीने कापणी आणि पायाने मळणी

हार्वेस्टिंग मशीन उपलब्ध झाले नाही आणि कापणीला विलंब झाला तर पावसामुळे भात पीक आडवे पडून कोंब येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंधरा-वीस वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा कोयतीने कापणी आणि पायाने मळणी करण्याची वेळ येऊ शकते. मजुरांची कमतरता आणि वाढलेली मजुरी, ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT