Agriculture in Goa Dainik Gomantak
गोवा

Agriculture in Goa: राज्यातील बागायती क्षेत्रफळात वाढ; 'कॅश क्रॉप' घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

उत्पन्नाचे स्रोत : 11867 हेक्टर जमीन लागवडीखाली

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture in Goa: राज्यात आंबा, केळी, अननस, तसेच इतर बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही बागायती पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत ठरत असतात. एका विशिष्ट कालावधीत या बागायती पिकांचे उत्पादन मिळत असल्याने शेतकरी आवर्जून आपल्या शेतात कॅश क्रॉप म्हणून त्याची लागवड करत असतात.

राज्यात दिवसेंदिवस पारंपरिक शेतीऐवजी आंबा, काजू, नारळ, सुपारी या पिकांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. आता अनेक शेतकरी आपल्या भातशेतीच्या क्षेत्रफळात बागायती पिकांची लागवड करत आहेत.

राज्यात आंबा हे एक महत्त्वाचे पीक आहे. मानकुराद, मालशेत, आल्फोन्सो तसेच इतर गोमंतकीय आंब्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे राज्यात कलमी आंबा लागवडदेखील होत आहे.

राज्यात केळी पिकाचीदेखील लागवड मोठ्या प्रमाणात आहे, त्यासोबतच आता अननस लागवडीकडेदेखील शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. राज्यातील एकूण १,८६७ हेक्टर जमीन बागायती पिकांच्या लागवडीखाली आहे.

शेतजमिनीचे जतन करा, युवकांनो शेतीकडे वळा...:- कृषिमंत्री रवी नाईक

शेतजमिनीचे जतन करा व युवकांनो कृषी व्यवसायाकडे वळा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी चिंचोणे येथील दुर्गा फार्ममध्ये केले. चारा कॅफेतेरिया व आंबा जनुक बॅंकेचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

त्यांच्या हस्ते तांत्रिक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले व कृषी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

यावेळी कृषी संचालक नेविल आफोन्सो यांनी सांगितले, की या बॅंकेमध्ये सध्या आंब्याच्या ३२ जाती उपलब्ध आहेत. गोव्यात १०० पेक्षा जास्त प्रकार असले तरी काही प्रकार लोप पावलेले आहेत. गुरांना चारा मिळणे अत्यंत कठीण होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चारा तयार करण्याकडे लक्ष पुरवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT