Goa Agriculture | Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: मातीत गोडवा पेरणाऱ्या तरुणीची कथा; सेंद्रिय पद्धतीने करते गूळाची निर्मिती

उमा प्रभुदेसाई या भाईडवाडा-कोरगाव येथील युवतीने सेंद्रिय पद्धतीने ऊस व त्यापासून गुळाचे उत्पन्न घेऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: उमा प्रभुदेसाई ही भाईडवाडा-कोरगाव येथील युवती. वडील उदय प्रभुदेसाई हे राज्यातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत असे प्रगतशील शेतकरी. वडिलांकडून शेतीचे संस्कार झाल्याने उमाने शेती विषयाकडे जाण्याचे निश्‍चित केले.

शेतीशी निगडित शिक्षण प्राप्त करून तिने 2018 मध्ये कृषी क्षेत्रातील बी.एस.सी. ही पदवीही मिळविली. त्यातूनच सेंद्रिय पद्धतीने ऊस व गुळाचे उत्पन्न घेऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

शिक्षण पूर्ण करून जेव्हा उमा घरी आली. तेव्हा तिच्यासमोर दोन पर्याय होते. त्यातील एक पर्याय म्हणजे कृषी अधिकारी म्हणून नोकरी करणे व त्यांच्या घराण्यातील शेतीच्या वेगवेगळ्या पिकांबरोबरच उसाचे पीक घेणे.

तेव्हा संजीवनी साखर कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत होता. उसाची खरेदी बंद झाली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा केली होती तर योगायोगाने याचवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ अशी घोषणा केली होती. यातून प्रेरणा घेऊन तिने वडिलांसोबत उसाचे उत्पन्न घेण्याचे ठरविले.

या उसापासून त्यांनी 100 टक्के सेंद्रिय गुळाचे उत्पन्न घ्यायचे ठरविले. प्रभुदेसाई यांच्या शेतातील ऊस हा पूर्णपणे सेंद्रिय असतो. अशा उसापासून दर्जेदार गूळ बनवायचे व तेही 100 टक्के सेंद्रिय पद्धतीचे असे त्यांनी ठरविले.

उसाला खरेदीदार नसल्याने गुळाचा प्रकल्प लवकर सुरू होणे आवश्यक होते. त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता होती. सरकारी योजनांसोबतच तिने नातेवाईक व कुटुंबीयांकडून आर्थिक मदत घेतली. गुळाच्या व्यवसायात नवीन असल्याने गडहिंग्लज येथील गुळाच्या व्यवसायातील काही तज्ज्ञ लोकांना आणले व त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

नृत्य व अभिनयात पारितोषिके

भरतनाट्यम्‌ व कथ्थकचे उमाने शिक्षण घेतले आहे. तिच्या शैक्षणिक जीवनात तिने नृत्य व अभिनयात बरीच पारितोषिकेही मिळविली आहेत. त्यातीलच काही म्हणजे, महाविद्यालयात तिला ‘गोल्डन गर्ल’ हा किताब प्राप्त झाला. बिकानेर येथे राष्ट्रीय पातळीवर कृषी विद्यापीठांसाठी आयोजित केलेल्या नाट्यस्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला होता.

भातशेती, भाजी लागवड

गुळाचे उत्पादन हे हंगामी असूनघ्या ते डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत चालते. त्यानंतर उमा सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात येणारा विविध प्रकारचा भाजीपाला, विविध प्रकारची फळफळावळ, कांदा, मिरचीची लागवड तर दामगो, वालक, शुभांगी आदी भातशेतीचे पीक घेण्यात रमते. शेती, भाजीपाला यासाठी गावातील गाई-म्हैशींचे मूत्र, सुके शेण यांचा वापर होतो.

सांस्कृतिक-सामाजिक कार्यातही पुढे

गूळ व कृषी व्यवसायाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उमा तितकीच कार्यशील आहे. तिला लहानपणापासूनच नृत्य अणि अभिनयाची खूप आवड.

वाड्यावरील युवक आणि युवतींना एकत्र आणून ‘निर्वाण’ नामक सामाजिक आणि सांस्कृतिक गट तयार केला आणि याद्वारे ती मुलांना नृत्य प्रशिक्षण देते. तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या पेडणे तालुक्यात कार्यरत असलेल्या संघाची ती सदस्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: बॉस पण खूश अन् पाकीट पण फुल! 12 नोव्हेंबरनंतर 'या' 4 राशींचे पालटणार नशीब; मंगळ गोचरमुळे आयुष्याला मिळणार नवा टर्न

Southern Railways Rules: रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी, रील्स लावल्यास होणार कारवाई; दक्षिण रेल्वेचा प्रवाशांना कडक इशारा! नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Goa Political Reservation: 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण प्रक्रिया पूर्ण करा; अनुसूचित जमातींचा सावंत सरकारला अल्टीमेटम!

Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर औषधांना दाद न देणारे जीवाणू, NIO चा निष्कर्ष; पावसाळ्यात 50 टक्के पाण्याची गुणवत्ता खराब

"हे नक्की काय चाललंय?", भोममधील बागायती जमिनीच्या रुपांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सरपंचांना निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा!

SCROLL FOR NEXT