Finger millet  Dainik Gomantak
गोवा

आत्मा’कडून पौष्टिक तृणधान्य लागवडीवर भर; नाचणी, वरी पिकाला राज्‍यात चांगली बाजारपेठ

नाचणी व वरी या पिकांना गोव्यात अत्यंत चांगली बाजारपेठ उपलब्ध

गोमन्तक डिजिटल टीम

योगेश मिराशी

Finger millet : अलीकडच्‍या काळातील बदलती जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्‍य बिघडत चालले आहे. त्‍यामुळेच तृणधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातोय. विशेष म्हणजे तृणधान्य हे गोमंतकीयांच्या आहारातील एक महत्त्‍वाचा घटक.

त्‍यामुळेच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त, शरीराला लाभदायी फायदे मिळवून देणारा, पोषक व विविध प्रकारची जीवनसत्त्‍वे असणाऱ्या नाचणी तसेच वरीच्या लागवडीवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीकडून (आत्मा) भर दिला जातोय.

नाचणी व वरीचे पीक गोव्यात तुलनेत चांगले येते. नाचणीची लागवड सरासरी 115 दिवसांत तर वरीची लागवड सरासरी 75 दिवसांत होते. येथे पडणारा पाऊस या दोन्ही पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांना चांगले पीक मिळू शकते.

या दोन्ही पिकांना गोव्यात अत्यंत चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प अधिकारी किशोर भावे यांनी याबाबत सांगितले की, नाचणी आणि वरीच्‍या पिकावर सध्या भर देण्यात आला असून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली आहेत.

गोव्‍याचा समावेश पश्‍चिम घाटात होतो. या परिसरात जास्त प्रमाणावर काजूची लागवड होते. पीक म्हणून त्याची लागवड करणे शक्य आहे. खुल्या जागेतही काजूची लागवड केली जाऊ शकते. अन्‍य पिकांच्या तुलनेत या काजूच्‍या पिकावर किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणावर होतो.

- किशोर भावे, ‘आत्मा’चे प्रकल्प अधिकारी

आरोग्‍यासाठी नाचणी उपयुक्त

नाचणीमध्ये लोहाचा चांगला स्त्रोत असतो. अनिमिया व हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्यांनी आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते. नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीरात ‘विटामिन सी’ची कमतरता जाणवत नाही व शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते. नाचणीचे सत्व हे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच दिले जाते. नाचणीमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बियाण्‍यांसाठी नोंदणी सुरू

सुमारे दोन क्विंटल बियाण्यांची नोंदणी करण्‍यात आली असून, त्‍याचे वाटप उत्तर गोव्यातील पाच तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ‘आत्मा’कडून केले जात आहे. आतापर्यंत सुमारे शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी नोंदणी केलेली आहे. आणखीही शेतकरी नाचणी, वरीची लागवड करण्यासाठी नोंदणी करू शकतात, असे भावे म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT