Goa Farmers Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Farmers Policy: ‘शेतकरी’ची व्याख्या बदलणार! विपणन मंडळाचा कारभार कृषी खात्‍याकडे; हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार सादर

Goa Agricultural Laws: सरकारने गोवा कृषी उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ कायदा, २००७ च्‍या कलम २ ‘ब’, १४ (२), (३), १६ (१), २६ (१) तसेच ७६ (२) मध्‍ये दुरुस्‍त्‍या केलेल्‍या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा कृषी उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ कायदा, २००७ मध्‍ये राज्‍य सरकारने महत्त्‍वपूर्ण दुरुस्‍त्‍या करताना ‘शेतकरी’ या शब्‍दाची व्‍याख्‍या बदलली आहे. शिवाय मंडळाचा कारभारही सहकार खात्‍याकडून कृषी खात्‍याकडे सोपविण्‍याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे विधेयक येत्‍या १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्‍या हिवाळी अधिवेशनात सादर करण्‍यात येणार आहे.

सरकारने गोवा कृषी उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ कायदा, २००७ च्‍या कलम २ ‘ब’, १४ (२), (३), १६ (१), २६ (१) तसेच ७६ (२) मध्‍ये दुरुस्‍त्‍या केलेल्‍या आहेत. याआधी पूर्वजांकडून आलेली जमीन कसणारे, स्‍वत:च्‍या मालकीची जमीन कसणारे तसेच कूळ म्‍हणून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश ‘शेतकरी’ या परिभाषेत केला जात होता.

परंतु यापुढे कृषी खात्‍याचे वैध कृषी कार्ड असलेल्‍या, किमान हजार चौरस मीटर जमीन असलेल्‍या, नोंदणीकृत एजन्‍सी किंवा कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीला वर्षभरात १५ हजारपर्यंतच्‍या कृषी उत्‍पन्‍नाची विक्री केलेल्‍यांनाच ‘शेतकरी’ असे म्‍हणता येईल, अशी दुरुस्‍ती सरकारने या विधेयकात केली आहे.

दुसरीकडे, कृषी उत्‍पन्न बाजार समिती याआधी सहकार खात्‍याअंतर्गत येत होती. त्‍यामुळे समितीचा कारभार सहकार निबंधक, साहाय्‍यक निबंधकांकडे येत होता. परंतु, या समितीचा कारभार यापुढे कृषी खात्‍याकडे देण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्‍यामुळे समितीचा कारभार कृषी संचालक, साहाय्‍यक कृषी संचालकांकडे जाईल, अशी दुरुस्‍तीही करण्‍यात आली आहे.

अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांना साध्‍या बहुमतानेही हटवता येणार!

सध्‍याच्‍या कायद्यातील कलम २६ नुसार कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांना पदावरून हटवण्‍यासाठी एकूण सदस्‍यांपैकी दोन तृतीयांश सदस्‍यांची मान्‍यता असणे गरजेचे होते. परंतु, या कलमातही सरकारने दुरुस्‍ती केली आहे. त्‍यानुसार यापुढे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांना साध्‍या बहुमतानेसुद्धा हटविण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT