Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: आगोंद येथील आगोंदेश्वर देवस्थानात मोठी चोरी; पितळेच्या वस्तूंसह 2 लाखांच्या आसपास लुट

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case: आगोंद येथे श्री आगोंदेश्वर देवस्थानात आज दि.3 रोजी, सकाळी 6.45 च्या दरम्यान मोठी चोरी झाली असल्याचे उघड झाले. काणकोण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डॉग स्क्वॉड, ठसे तपासणी तज्ञांना पाचारण करण्यात आले.

पोलिस निरीक्षक हरीष राऊत देसाई यांनी पोलीस तपास सुरु असल्याचे सांगितले. देवस्थान समिती अध्यक्ष प्रमोद‌ वि. देसाई यांनी रु. 2 लाख च्या आसपास चोरांनी लुटले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

सविस्तर वृत्तानुसार आज रविवारी नेहमी प्रमाणे देवस्थानचे पुतू वेळीप सकाळी 6.40 च्या दरम्यान श्री आगोंदेश्वर देवस्थानकडे पोहचले असता देवालयाच्या मुख्य दरवाजा बंद‌ मात्र लावलेले मोठे कुलूप गायब असल्याचे आढळून आले.

निरिक्षण केले असता ते कापून काढल्याचे दिसून आले. तसेच पाठीमागील बाजूचा दरवाजाचे कुलूप सुद्धा असेच कापून काढल्याचे दिसून आले. तर पाठीमागे अभिषेकास वापरात आणले जाणारे तांब्याचे पात्र व आंतील समईचा काही तोडलेले भाग दिसून आले.

त्यांना हा चोरीचा प्रकार वाटल्याने त्यांनी त्वरित स्थानिक महाजन नारायण देसाई व रामदास सावंत यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर‌ हा सर्व प्रकार आगोंद पोलीस चौकी व त्यानंतर काणकोण पोलिसांना पर्यंत पोहोचवण्यात आला.

ठसे तज्ञांच्या कामानंतर देवालयात फंडपेटी, मोठ्या असलेल्या 2 घंटा, गाभा-याजवळील 2 मोठ्या समई, 2 मध्यम स्वरुपाच्या समई, आरती सामान व अन्य काही सामान गायब असल्याचे दिसून आले.

नुकतेच या ठिकाणी असलेल्या 2 देवळांचा वर्धापन दिवस सोहळा संपन्न झालेला होता. त्यामुळे फंडपेटीतील 70 ते 80 हजारांची रक्कम मिळून रु. 2 लाख लुटले. अशी माहिती प्राथमिक अंदाजानुसार देवस्थान समितीकडून व्यक्त केली आहे.

हे देवस्थान लोकवस्ती पासून जरा दूर आहे. ‌या देवस्थानात 6 वर्षांपूर्वी सुद्धा अशी चोरी झाली होती. मात्र चोर काही सापडले नव्हते. तपासणीसाठी आणण्यात आलेले श्वान जवळच्या शेतात 100 मीटर पर्यंत घुटमळत नंतर परतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT