Adventure Sports in Goa: जंगलातील उंच डोंगर, उतार, खडक, नद्या, उंच फेसाळून वाहणारे धबधबे, अडचणीच्या वाटा या गोष्टी मानवासाठी अगदी जवळच्या आहेत. अशा क्षेत्रात फिरणे म्हणजे एक मोठे धाडसच असते.
पण अशा भागात उंच डोंगरावर दोरीच्या सहाय्याने चढणे म्हणजे त्याचे धाडस व प्रशिक्षण आवश्यक असते. हे प्रशिक्षणाचे काम वाळपईचे प्रदीप गवंडळकर करीत आहेत.
अगदी सेवाभावनेतून गेली वीस वर्षाहून गवंडळकरांनी व्रत जोपासले आहे. वाळपईत प्रदीपचा मध्यवर्ती अगदी छोटेखानी शिंपी व्यवसाय आहे.
तरुणांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जंगलात, डोंगरावर, खडकाळ भागात दोरीच्या सहाय्याने थरारक खेळ घेण्यात ते माहीर आहेत. आतापर्यंत 600हून अधिक वेळा साहसी जंगलात पदभ्रमण खेळ, साहसी प्रशिक्षणाचे उपक्रम घेतले आहेत.
युवकांमध्ये धाडस तसेच मनातील भीती दूर होण्यासाठी असे खेळ जीवनात गरजेचे आहेत. जास्तकरून शनिवारी व रविवारी उपक्रम घेतो. मूळ दांडेली-कर्नाटक येथे गावी माध्यमिक शाळेत असताना सहलीवेळी जंगलात आम्हाला दोरीच्या मदतीने चालण्याचे थरारक खेळ दाखविले होते.
तिथूनच आवड निर्माण झाली. स्वत:जवळ असलेल्या उपलब्ध साधनांचा जंगलात कसा सुयोग्य वापर करता येईल याचा अनुभव डोंगर कपारीत झाला पाहिजे. - प्रदीप गवंडळकर, वाळपई
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.