rabies free Goa Dainik Gomantak
गोवा

Rabies Free Goa: रेबीज नियंत्रणात गोवा अव्वल! 2019 पासून एकही रुग्ण नाही; ठरले भारतातील एकमेव राज्य

Goa rabies eradication: गोव्याने रेबीज निर्मूलन मोहिमेत मोठे यश मिळवले असून गोवा हे रेबीज नियंत्रित करणारे भारतातील पहिले एकमेव राज्य ठरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याने रेबीज निर्मूलन मोहिमेत मोठे यश मिळवले असून गोवा हे रेबीज नियंत्रित करणारे भारतातील पहिले एकमेव राज्य ठरले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१४ मध्ये सुरू केलेल्या मिशन रेबीज प्रकल्पामुळे २०१९ पासून गोव्यात मानवी रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही, तर मध्य गोव्यातील सहा तालुक्यांत प्राण्यांमध्येही रेबीजचे विषाणू आढळलेले नाहीत.

सीमावर्ती महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून विषाणू येण्याची शक्यता कायम असल्याने शेजारील तालुक्यांत प्राण्यांमध्ये विषाणूंचे प्रमाण आढळत असल्याने मोहिमेची तीव्रता वाढविली आहे, असे मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरुगन अपुपिल्लई यांनी सांगितले.

जागतिक रेबीज दिनानिमित्त त्यांनी गोव्यातील रेबीज नियंत्रण मोहिमेचा आढावा घेतला. डॉ. अप्पुपिल्लई म्हणाले, की रेबीज नियंत्रणाच्या यशामुळे गोव्यातील रेबीज उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गोवा मॉडेल’ म्हणून ओळखला जातो. आमच्या कार्याची जागतिक स्तरावर देखील नोंद घेतली आहे.

२० हजार लोक ठरतात रेबीजचे बळी

२८ सप्टेंबर हा ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून ओळखला जातो. रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच या आजाराचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

हा उपक्रम रेबीज लस शोधणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या स्मरणार्थ राबवला जातो. दरवर्षी भारतात सुमारे २० हजार लोक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात. त्यापैकी बहुतांश मुले असतात. त्यामुळे रेबीजवर नियंत्रण आणणे, हे मोठे भारतात आणि जागतिक स्तरावर आव्हान आहे.

सीमावर्ती तालुक्यांमध्ये लसीकरण मोहिमेला वेग

राज्यात जरी रेबीजचे नियंत्रण असले तरी शेजारील राज्यांमध्ये रेबीजचे संक्रमण असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरून अधूनमधून विषाणूंचा प्रवेश होतो. त्यामुळे गोव्याच्या सीमावर्ती तालुक्यांत लसीकरण आणि जनजागृती मोहीम तीव्र केली आहे. त्याचा लाभही आम्हाला झाला असून गेल्या वर्षी फक्त ४ प्रकरणे नोंदविली, तर यंदा अद्याप एकही प्रकरण नोंदविलेले नाही, असे डॉ. अपुपिल्लई यांनी सांगितले.

राज्यात जरी रेबीज नियंत्रित असला तरी सातत्याने जागृती, लसीकरण आणि निर्बिजीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने वर्षभर रेबीज मिशनद्वारे विविध कार्यक्रम, उपक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येते. ३. २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत फोंडा, पणजी, मडगाव, वास्को, केपे, सांगे येथे जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.

यात वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, रॅली, पथनाट्ये व आरोग्य कार्यशाळांचा समावेश असेल.

याच दिवशी फोंडा येथे निर्बिजीकरण शिबिराचे उदघाटन होणार आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत १ हजार कुत्र्यांचे मोफत निर्बीजीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीला फोंडा येथे ५ किमी ‘रेबीज रनाथॉन’ होणार असून त्यात ३०० हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात Gen Z कोणते कपडे घालतात?" इन्फ्लुएन्सर करिष्मानं सांगितला फॅशन फंडा; सोशल मीडियावर Video Viral

मोबोर किनाऱ्यावर टळली मोठी दुर्घटना! मासेमारी जहाजाचा अपघात; साधनांचा अभाव तरीही वाचले 27 जणांचे प्राण

BCCI New President: बीसीसीआयला मिळाला नवा 'बॉस', मिथुन मन्हास अध्यक्षपदी विराजमान

Bhagat Singh Jayanti: ..ध्येयप्राप्तीसाठी घरदार सोडले! ऐन तारुण्यात प्रेयसी, पैसाअडका, स्वप्ने पाहिलीच नाहीत; गुरुदेव भगतसिंग

Mumai Mahim History: कळव्याला 2 फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले, भोज राजा प्राणास मुकला; इतिहास मुंबईच्या माहीमचा

SCROLL FOR NEXT