Drunk and Drive Traffic Police Action Goa
पणजी: गेल्यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये गोव्यात अनेक अपघातांची नोंद झाली होती. दर दिवशी होणाऱ्या अशा जीवघेण्या अपघातांवर आळा बसवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीमा राबवण्यात आल्या. समोर आलेल्या माहितीनुसार गोवा वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षातभरात ५,४३८ दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
वर्ष २०२३ मध्ये गोव्यात एकूण २,७९५ अपघातांची नोंद झाली होती आणि यांमध्ये २७५ लोकांनी जीव गमावले होते, तर दुसऱ्या बाजूला १ जानेवारी २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ या काळात गोव्यात २,६४० अपघातांची नोंद झाली आहे आणि २७० लोकांनी जीव गमावले आहेत.
गोव्यात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने यांपैकी अनेक अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये प्रामुख्याने दारू पिऊन गाडी चालवणे, मोबाईलचा वापर करताना गाडी चालवणे, हाय स्पीडने गाडी चालवणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
गोवा वाहतूक पोलिसांनी वर्षे २०२३ मध्ये नियमभंग करणाऱ्या एकूण १,८०७ वाहनचालकांवर गुन्हा नोंद केला होता, तर यंदाच्यावर्षी ५,४३८ वाहनचालकांच्या नावे गुन्हे दाखल झाले आहेत. २०२३ आणि २०२४ यांमध्ये तुलना करायची झाल्यास रस्ता अपघातांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झालीये .
गोव्यातील रस्ते अपघातांची समस्या कायमची सुटावी म्हणून सर्वोच्य न्यायालयाने रस्ता सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. रस्ता सुरक्षेचे नियम न पाळलेल्या चालकांचे, तसेच दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द केले जातील आणि अशी कारवाई गोव्यात सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.