Goa Accidents Death in 2023
Goa Accidents Death in 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Accidents: गोव्यात या वर्षात आत्तापर्यंत अपघातात 200 मृत्यू; 2865 ड्रायव्हिंग परवाने निलंबित

Akshay Nirmale

Goa Accidents Death in 2023: गोव्यात सन 2023 या वर्षात आत्तापर्यंत अपघातांमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर आज, शुक्रवारपासून सुरू झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात अपघात, जबाबदारीने ड्रायव्हिंग करण्याबाबत जागृतीचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे. राज्यात 6 ते 12 ऑक्टोबर या काळात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे.

गोव्यात होणाऱ्या अपघातांच्या कारणांमध्ये रस्त्यातील ब्लॅक स्पॉट्स, बेदरकारपणे वाहने चालवणे, वेगाने वाहने चालवणे, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात यांचा समावेश आहे. याशिवाय वाढती वाहने, पर्यटकांचा ओघ याचा रस्त्यांवरील ताण मोठा आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी अंदाजे 1.35 दशलक्ष लोक रस्ते अपघातात बळी पडतात. गोव्यात रस्ते अपघातात दरवर्षी सरासरी 300 मृत्यू होतात.

चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 2014 रस्ते अपघात झाले असून त्यात 196 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 56 अपघात प्रवण ठिकाणे आहेत. त्यातील 33 अपघात प्रवण क्षेत्रे आणि 23 ब्लॅक स्पॉट आहेत.

गोव्यातील बहुतेक अपघात मानवी चुकांमुळे होतात. आता इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड सिग्नलवर काउंटडाउन टायमर इतर पायाभूत सुविधा आल्या आहेत. त्यातून हेल्मेटशिवाय ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट रायडिंग, वाहन चालवताना फोनवर बोलणे यासाठी दंड केला जात आहे.

त्यामुळे चार महिन्यांत नियम उल्लंघनाने प्रकार कमी झाले आहेत. वाहनचालक परवाना निलंबनाबाबत नागरिक सावध झाले आहेत. राज्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत वाहतूक नियमभंगासाठी 2865 ड्रायव्हिंग परवाने निलंबित केले गेले आहेत.

दरम्यान, अपघात रोखण्यासाठी स्वयंशिस्त सर्वाधिक महत्वाची आहे. रहदारीचे नियम आणि रस्त्याच्या चिन्हांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT