Goa Accident:  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: ड्रायव्हरचा डोळा लागला अन् कार रस्त्यावरून थेट जंगलात घुसली; शिवोली-म्हापसा मार्गावरील घटना

सुदैवाने जीवितहानी नाही मात्र गाडीचे नुकसान

Akshay Nirmale

Goa Accident: गोव्यात गुरूवारी 30 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या वेळी एका कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रायव्हरचा डोळा लागल्याने ही कार थेट जंगलात घुसली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

पण, कारचे मात्र नुकसान झाले आहे. या गाडीतून संभा रेडकर हे त्यांच्या दोन मुलांसह प्रवास करत होते. भावाला सोडून परत येत असताना हा अपघात झाला.

पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील रेडेकर कुटूंबीय हे त्यांच्या टोयोटा ग्लान्झा (GA 11 A 4787) या कारमधून शिवोलीतून म्हापसाकडे येत होते. या वेळी गाडीत तिघेजणच होते. यात त्यांच्या 15 वर्षीय मुलगाही होती.

दरम्यान, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जात असताना ड्रायव्हरचा डोळा लागल्याने ही कार मार्ग बदलून थेट जंगलातच घुसली. काही वेळातच सर्वांच्यात काय घडले आहे ते लक्षात आले. सुदैवाने ही कार फार धोकादायक स्थितीत नव्हती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातात कारमधील कुणालाही काहीही दुखापत झालेली नाही. तथापि, गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. गाडीचा बंपर फुटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT