Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: पोरस्कडे पेडणे येथे चारचाकी- दुचाकीमध्ये भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

Goa Accident Case: जखमी दुचाकीस्वारासंबंधी सविस्तर माहिती समजू शकली नाही.

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case: गोव्यात दिवसेंदिवस अपघातांचे स्तर वाढतच असून दोन दिवसांपूर्वी उसगाव, याठिकाणी अपघात झाले होते. अपघातांचा हा सिलसिला सुरूच असलेला पाहायला मिळतोय.

आज रविवारी दुपारच्या सत्रात पेडणे राष्ट्रीय महामार्गावर पोरस्कडे चारचाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडून आला.

या अपघातात दुचाकी चालक गंभीररीत्या जखमी झालाय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दखल केल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून पुढील तपास सुरु असल्याचे समजतेय.

या अपघातासंबंधित तसेच जखमी दुचाकीस्वारासंबंधी सविस्तर माहिती समजू शकली नाही.

दोन दिवसांपूर्वी कुठ्ठाळी- बांबोळी येथे महामार्गावर आणि बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर अपघात झाले होते.

पहिल्या अपघातात शीतपेयांच्या बाटल्याची कंटेनर महामार्गावर पलटला असून यावेळी शीतपेयांच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पसरला होता. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नव्हती.

तर बेतोडा येथे मुख्य बायपास रस्त्यावर पिकअपची धडक बसून तुकाराम रामा जांगली (रा.बोणबाग, वय 48) हा गंभीर जखमी झाला होत. मात्र उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: विश्वविजेता 'भारत'! टीम इंडियाने सहाव्यांदा पटकावला 19 वर्षांखालील 'विश्वचषक'; फायनलमध्ये 100 धावांनी उडवला इंग्रजांचा धुव्वा

Betaki Khandola: सफर गोव्याची! गावकऱ्यांनी पाण्यासाठी मुलीचा बळी दिल्याची दंतकथा; विहंगम 'बेतकी'

Surya Gochar 2026: ग्रहांचा राजा 'सूर्या'चा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश, 'या' 4 राशींना लागणार लॉटरी; अडकलेले पैसे परत मिळणार

Goa Vehicle Theft: एक-दोन नव्हे तर 7 चोरीच्या गाड्या जप्त! सराईत वाहन चोरट्याला ठोकल्या बेड्या, साळगाव पोलिसांचा 'स्ट्राँग' गेम

Viral Video: कॅफे आहे की डान्स फ्लोअर? टिप मिळताच वेटर्स धरतात ठेका, ग्राहकांच्या पसंतीस उतरतोय 'हा' खास अंदाज; नेटकरी फिदा

SCROLL FOR NEXT