Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: चिंताजनक! अपघात सत्र काही थांबेना; दिवसभरात दोन अपघातांची नोंद

वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येतेय.

Ganeshprasad Gogate

Goa Accident Case: राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून दिवसागणिक अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी मालपे पेडणे येथील महामार्गावरील उतरणीवर महाराष्ट्र पासिंगच्या एका कारचा (MH23 AS 7909) अपघात झाल्याचे वृत्त अमोर आले आहे.

हा अपघात गुरुवारी रात्री घडल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाली आहे. या अपघातात एकूण चारजण जखमी झाले असून चौघांनाही बांबोळी येथे उपचारासाठी नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तसेच म्हापसा लगतच्या थिवि येथे भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्ता सोडून शेजारच्या शेतात घुसली. सुदैवाने पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे.

या घटनेत वाहनाचे नुकसान झाले असून गाडीमधील भाजीपाल्याच्या गोण्या सर्वत्र पसरल्या होत्या. या दोन्ही घटनांची पोलीस दफ्तरी नोंद झाली आहे का यासंबंधी माहिती मिळू शकली नाही.

वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी cctv कॅमेरा बसवले आहेत. मात्र तरीही वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अपघात होत असल्याचे दिसून येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT