baga accident news Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बागामध्ये पर्यटकांचा 'ड्रंक-ड्रामा' मद्यधुंद अवस्थेत गाड्यांना धडक; दोन कामगार जखमी

Road Accidents Goa: या धडकेत वॅगनआर गाडी जवळपास ७-८ मीटरपर्यंत फरफटत गेली आणि जवळून चालणारे दोन कामगार या अपघातात जखमी झाले

Akshata Chhatre

म्हापसा: बागा येथे एका कर्नाटक नोंदणीकृत कारगाडीने मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन कामगार जखमी झाले असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यटकांनी पहिल्यांदा बागा येथील पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या एका वॅगनआर गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत वॅगनआर गाडी जवळपास ७-८ मीटरपर्यंत फरफटत गेली आणि जवळून चालणारे दोन कामगार या अपघातात जखमी झाले आहेत.

या कर्नाटकातील कारगाडीने स्थानिक टॅक्सी चालक सनी नार्वेकर यांच्या मालकीच्या एर्टिगा गाडीलाही धडक दिली आणि त्यानंतर चालक कार घेऊन घटनास्थळावरून वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच, सतर्क टॅक्सी चालकांनी कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पर्यटकांनी कार वेगाने पळवल्याने त्यांना पकडण्यात स्थानिकांना अपयश आले. या घटनेनंतर काही वेळाने ही कार बागा येथील एका कॅसिनोबाहेर दिसली. पर्यटकांनी काही वेळ कॅसिनोमध्ये घालवला आणि त्यानंतर तेथूनही ते निघून गेले. या घटनेमुळे बागा परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अपघातामुळे जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कारचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पर्यटक मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे बागा परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT