Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : नातीचा वार्षिक मास पाहण्यासाठी गेलेले ज्योकी-लीना काळाच्या पडद्याआड!

करमणेत हळहळ ; ज्योकी पत्नीसह चार पाच वर्षांतून एकदा यायचे गोव्यात, दुबई येथे होते वास्तव्यास

दैनिक गोमन्तक

मडगाव : एका वर्षापूर्वी त्यांनी आपली नात गमावली. हे दुःख पचवून तिच्या पहिल्या पुण्यतिथी दिनी करमणे चर्च मध्ये ठेवलेल्या वार्षिक मासमध्ये भाग घेण्याच्या इराद्यानेच ज्योकी रॉड्रीग्स हे पत्नी लीना अन्य कुटुंबियांसह घरी आले होते.

मात्र या मासमध्ये भाग घेण्याचे त्यांच्या नाशिबीच नव्हते. कारण घरी येताना वाटेतच त्यांना अपघात झाला. मंगळवारी सकाळच्या प्रहरी झालेल्या या अपघाताचे वृत्त करमणे गावात पोहोचल्यावर या गावातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.

ज्योकी रॉड्रिग्ज हे मूळ करमणे येथील असले तरी ते पूर्वी ब्रिटीश एअरव्हेज काम करत असल्यामुळे दुबई येथेच स्थायिक झाले होते. 15 वर्षांपूर्वी ते या कामातून निवृत्त झाले. त्यांची मुलगी जेसी ही सुद्धा दुबई येथेच सरकारी इस्पितळात नर्स म्हणून काम करीत असल्याने सारे कुटुंब दुबई येथेच राहत होते.

असे असले तरी ते चार पाच वर्षांतून एकदा गोव्यात ते घरी येत असत. त्यांचे जावई सातान हे जहाजावर खलाशी म्हणून काम करतात. जेसीची दुसरी मुलगी वालांका हिला मागच्या वर्षी दुबईत असतानाच एका आजारामुळे मृत्यू आला होता.

8 ऑगस्ट रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने येथे गोव्यात तिच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मास ठेवले होते. या मासमध्ये भाग घेण्यासाठीच संपूर्ण कुटुंब काल गोव्यात आले होते.

जेसी, सातान गोमेकॉत उपचारार्थ दाखल

अपघातात ज्योकी व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी जेसी, जावई सातान नोरोन्हा आणि नात वेनिता हे जखमी झाले. जेसी व सातान यांना या अपघातात फ्रॅक्चर झाल्याने सध्या त्यांच्यावर गोमेकॉत तर त्यांची नात वेनिता हिच्यावर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू असून तिची प्रकृती सुधारत आहे. मात्र या अपघाताचा तिच्या मनावर जबर धक्का बसला आहे. या वृत्ताने आम्हाला धक्का दिला अशी प्रतिक्रिया सिरील लैताव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT