Goa fire incident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दिवा लावत असतानाच होत्याचं नव्हतं झालं; आगीत होरपळून वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Fire Accident Goa: ७० वर्षीय स्मिता लोटलीकर यांचा दिवा लावत असताना भाजल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला

Akshata Chhatre

फोंडा: शांतपणे दिवा लावण्याचा प्रयत्न एका दुर्घटनेत बदलला. फोंडा तालुक्यातील अंबाजी येथील ७० वर्षीय स्मिता लोटलीकर यांचा दिवा लावत असताना भाजल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ध्यानी-मनी नसलेल्या या घटनेने संपूर्ण गोव्यात दुःखाची लाट पसरली आहे.

खरं तर दिवा लावणं हा अनेक लोकांच्या दैनंदिन सवयीचा एक भाग आहे. देशात कित्येक लोकं या धार्मिक विधींचं पालन करतात. मात्र फोंड्यात दिवा लावत असताना गुरुवारी (६ मार्च) एक दुर्दैवी घटना घडली. गॅस लायटरने दिवा पेटवण्याचा प्रयत्न करत असताना, ७० वर्षीय स्मिता लोटलीकर यांच्या कपड्यांना आग लागली, आणि क्षणार्धात आगीच्या ज्वाळांचा भडका उडाला. आग वाढल्याने त्यांना बरीच जखम झाली.

शेजारी आणि कुटुंबीयांनी तत्काळ यावर हालचाल करत लोटलीकर यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या भाजलेल्या जखमांची तीव्रता लक्षात घेता, त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलवण्यात आले. उपचार सुरु असताना देखील दुर्दैवाने, उपचारादरम्यान लोटलीकर यांचा मृत्यू झाला.

अंबाजी येथील एका रहिवाशाने या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, "क्षण किती लवकर बदलू शकतात याची ही दुःखद आठवण आहे. स्मिता एक दयाळू बाई होती, नेहमी अत्यंत भक्तीभावाने दिवा लावायची. ती निघून गेली आहे, मात्र यावर विश्वास ठेवणं आमच्यासाठी कठीण आहे." उपनिरीक्षक एस. प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली फोंडा पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ही घटना एक दुर्दैवी अपघात असल्याचे दिसत असले तरी, अधिकारी सर्व पैलूंचा विचार करण्यासाठी परिस्थितीची बारकाईने तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT