AAP Goa Coordinator Rahul Mhambre Dainik Gomantak
गोवा

Goa: प्रत्येक बूथवर केजरीवालांची 'रोजगार हमी' पोहचविण्यासाठी आप सज्ज

गोव्याचे संयोजक राहुल म्हांब्रे यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

Dainik Gomantak

आम आदमी पार्टी (AAP) गोव्यातील प्रत्येक बूथवर केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची 'रोजगार हमी' (Employment Guarantee) पोहचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपचे संयोजक राहुल म्हांबरे (AAP Coordinator Rahul Mhambre) यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नोकरीच्या हमीच्या तपशीलांवर आप नेत्यांना मार्गदर्शन केले . प्रत्येक गोमंतकीयांना या मोहिमेत कसे सहभागी करावे आणि याची माहिती जनतेपर्यत कशी पोहचवावी याची माहिती देण्यात या वेळी देण्यात आली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात सरकारी नोकऱ्यांमढे पारदर्शकता आणून सर्वसामान्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील अस वचन दिल आहे . त्याच प्रमाणे आम आदमी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक युवकाला रोजगार आणि रोजगार उपलब्ध तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला दरमहा 3,000 रुपये बेकारी भत्ता दिला जाईल अस आश्वासन दिले आहे . याशिवाय खाजगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. पर्यटन आणि खाणकाम बंद झाल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील अशी घोषणाही करण्यात आली आहे . तसच कौशल्य विकासासाठी आप सरकार दिल्लीच्या डीएसईयूच्या धर्तीवर गोव्यात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करेल.

गोव्यातील तरुणांना बर्याच काळापासून नोकऱ्यांच्या अभावामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार हि परिस्थितीत बदलण्याची एकमेव आशा म्हणून तरुण आता आपकडे पाहत आहेत. लॉकडाऊन दरम्यान उदरनिर्वाह गमावलेल्यांना अरविंद केजरीवाल यांनी कशा प्रकारे मदत केली , रोजगार पोर्टलने अनेकांना नोकऱ्या कशा दिल्या आणि शिक्षणात कौशल्य विकास कसे एकीकृत केल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे हे आप नेते गोवेकरांना समजावून सांगतील.

"आम आदमी पार्टीला गोव्यातून खूप प्रेम मिळाले आहे. गोवेकरांना खरोखरच कौतुक वाटत आहे कि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत या सर्व गोष्टी कशा शक्य केल्या आहेत!मला विश्वास आहे की आमचे नेते हा संदेश तळागाळापर्यंत नेतील!" असे राहुल म्हांब्रे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT